नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 12, 2021

मी ठाम आहे ..

निर्धार माझा आग आहे ,
बाकी ही सगळी राख आहे ..

अपयशाचा पर्वत चढण्यास मी ठाम आहे ,
हजारो वादळांना झेलण्याची माझ्यात धमक आहे ..

खाच - खळग्यांचा प्रवास मला मान्य आहे ,
तो पार करण्यातच खरी मजा आहे ..

धगधगत्या ज्वाला शी मैत्री करायची ,
रणरणत्या निखाऱ्यातून एक अनुभूती घडवायची ...

असंख्य वादळांना झेलायच एकट्यान,
ह्या जगावर राज्य करायचं  स्वाभिमानान ,

शतदा जमिनीला खिळून ही ,
पुन्हा पुन्हा उभ रहायचं नव्या जोमानं ....





3 comments:

  1. खूपच जोश पूर्ण आहे

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर,प्रेरणादायी रचना👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...