बाकी ही सगळी राख आहे ..
अपयशाचा पर्वत चढण्यास मी ठाम आहे ,
हजारो वादळांना झेलण्याची माझ्यात धमक आहे ..
खाच - खळग्यांचा प्रवास मला मान्य आहे ,
तो पार करण्यातच खरी मजा आहे ..
धगधगत्या ज्वाला शी मैत्री करायची ,
रणरणत्या निखाऱ्यातून एक अनुभूती घडवायची ...
असंख्य वादळांना झेलायच एकट्यान,
ह्या जगावर राज्य करायचं स्वाभिमानान ,
शतदा जमिनीला खिळून ही ,
पुन्हा पुन्हा उभ रहायचं नव्या जोमानं ....
खूपच जोश पूर्ण आहे
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर,प्रेरणादायी रचना👌👌👌
ReplyDelete