तिच्याशिवाय घर हे सूने सूने वाटते ...
तिची चिडचिड सवयची झालेली ,
आज तिची आठवण खूप येऊ लागली ...
जाताना ,
आता परत येऊच नको ,
आम्ही सगळे तिला हसत हसत बोललो ,
आता मात्र तिच्या आठवणीने डोळयात पाणी दाटलं ...
माझी आई माहेरपणासाठी गेली ,
पहिल्यांदा आम्हाला सोडून राहिली
तिची आठवण क्षणोक्षणी येऊ लागली ,
तिची उणीव खूप भासू लागली ....
मला आज खूप एकट एकट वाटू लागलं ,
तिचं अस्तित्व आज खऱ्या अर्थाने कळलं ...
Miss you aie ....
अप्रतिम वास्तविक रचना
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDelete