नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 10, 2021

मी तुझी वटसावित्री

मी तुझी वटसावित्री ,

तुझीच अर्धागिनी ,

पूर्व जन्मी ची पुण्याई ...

सत्यवान तू माझा 

ह्या सावलीला आधार नवा लाभला ...

ह्या सावित्रीचा वट तू जाहला ... 

नवखे हे नाते ,

सत्यवाना तुझ्याशी जुळले ,

ह्या वटसावित्री ला पूर्णत्व लाभले ...

आली ती तुझ्या विश्वासावर ,

राज्य बापाचे सोडून ,

नाते प्रेमाचे तोडून ...

तूच आता आयुष्याचा सहारा ,

माझ्या दीलाचा राजा ....

मी वट सावित्री तुझी ,

पूर्व जन्मी ची पुण्याई ,

सत्यवान तू माझा ....


ही कथा आहे आरूष आणि मेघनाची  . एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम आणि विश्वास एकमेकांच अस्तित्व एकमेकांशिवाय अपूर्ण ...तो तिचा वट तर ती त्याची वटसावित्री  अरेंज मॅरेज पण लव्ह मॅरेजलाही मागे सोडेले एवढी hot त्यांची लव्ह स्टोरी . 


आज व्हॅलेंटाईन डे ..तिचा लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट ती छान करणार होती ...कारण व्हॅलेंटाईन डे बरोबरच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस ही होता . डबल धमाका ...ती खूप खूष होती . तिने बऱ्यापैकी तयारी केली होती .रूम पूर्ण गुलाबाच्या फुलांनी सजवली होती . पूर्ण हॉल मध्ये कॅंडल लावल्या होत्या . मस्त फुलांचे अत्तर चहूकडे शिंपडले होते जल्लद  तयारी तिने केली होती .


तिकडे तिचा वट म्हणजेच तिचा  आरूष खूपच डिस्टर्ब होता .  मेघनाला आरूषची एवढी सवय झाली होती की , कुठे एक  दिवस ती त्याला सोडून राहत नव्हती .  माहेरी पण ती कधी तीन चार दिवस  मुक्कामाला राहत नव्हती . आरूष सोबत जायचं आरुष् सोबत वापस यायचं .त्याच्याशिवाय एक  क्षण ती राहू शकत नव्हती. तो तिचा श्वास होता. तिचं ओक्सीजन होता . ह्याची चांगलीच जाणीव आरूषला होती . तो त्याच्या नाहीतर तिच्या काळजीने अस्वस्थ होत होता पल्याला हे जग कायमचं सोडून जावं लागतं आहे . ह्याच्यापेक्षा ही जास्त वाईट ह्याचं वाटतं होत . आपण कोणाचातरी वट आहोत . आणि आपणच आपल्याच हक्काच्या माणसाच छत्र हिरावून घेऊ लागलो .  मीच माझ्या वटसावित्रीचा श्वास तिच्यापासून दूर घेऊन जाणार आहे . ह्या दडपणाने तो बधीर झाला होता .पूर्णपणे खचून गेला होता .


शेवटी त्याला एक कल्पना सुचली . आपण आपल्या वटसावित्रीला एक नवीन वट वृक्ष गिफ्ट देऊच शकतो ह्या जगातून जाण्याआधी ...आपलं हे जग सोडून जाणं निश्चित आहे . पण  आपण आपल्या वटसावित्रीला अर्ध्यावर सोडून जायचं नाही . तिला एक नवं अस्तित्व तिचं नव वट देऊन जायचं .तो लगेच मेघाला कॉल करतो आणि सांगतो , " मेघा तू आज खूप सुंदर रेडी हो लग्नाच्या पहिल्या रात्री झाली होतीस अगदी तशीच तितकीच सुंदर आज मी तुला सरप्राइज देणार आहे . "


तीही त्याला आनंदाने सांगते मी पण आज तुला खूप मोठं सरप्राइज देणार आहे . हे मी तुला दिलेलं तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट असेल . तो म्हणतो , " ओके "  ती म्हणते , "  पण नेहमीच तू पहिले गिफ्ट देतो आज मात्र मी देणार hmm "


तो बोलतो , " ओके नो प्रोब्लेम , चल बाय येतो मी "

ती " hmm बाय सी यू " 

तो मनाची पूर्ण तयारी करून आज तिला त्याच्या मनातलं दुःख सांगून तिच्या पदरी सुख घालण्याचा प्रयत्न करत होता . घरी गेल्यानंतर बेल वाजता क्षणीच मेघा धावत येऊन दरवाजा ओपन करते . त्याला बघताच एक मिठी मारते .नेव्ही ब्ल्यू कलरची साडी , स्लिवलेस ब्लाऊज केस मोकळे रेड कलरच डार्क लिपस्टिक कपाळावर स्टोन ची टिकली साैंदर्य नव्याने खुलल होत . आरूष  एक क्षण तिला बघताच हरखून गेला होता . पण थोड्याच वेळात भानावर आला आणि हळूच बोलला, " बोल आज काय सरप्राइज देणार आहे मला ? " 

" Hmm आणि मॅडम आज लाखात एक दिसताय " 😊😊😊😊😊👌👌👌❣️❣️❣️


ती जराशी लाजली , आणि त्याच्या खांद्यावर तिचे दोन हात टेकवत त्यांच्या कानात हळूच गुण गुणली , "  आरूष अभिनंदन तुझी वट सावित्री आई होणार आणि तिचा वट बाबा "  अस गुणगुणून लगेच ती खिडकीच्या दिशेने धावली . तो तिच्या मागे गेला . आनंद त्याच्या उरात दाटला होता . डोळे भरून आले होते .  त्याने तिला एक घट्ट मिठी मारली आणि मग ति म्हणाली  ,  " आता मी पण एक्सायटेड झाले हा मला पण लवकर सरप्राइज हवं आहे . काय आहे माझं गिफ्ट लवकर प्लीज लवकर " त्याचे डोळे पुन्हा भरून आले  . आणि तो उरात दाटलेले हुंदके धाबत , " हो तुझ पण सरप्राइज लवकर देतो . तो तिला रूम मध्ये नेऊन कॉट वर बसवतो . आणि सांगतो , " हे बघ मेघना मी आज मी तुला जे सांगणार आहे . तू आधी प्रॉमिस कर तू माझ ऐकशील . आक्रोश करणार नाही . मला भलते सलते प्रश्न ही विचारणार नाही . " 

ती " डोन्ट वरी मी काहीही भलत सलत विचारणार नाही आणि आक्रोश पण करणार नाही . " 

वटसावित्री तुझ्या आयुष्यात एक नवीन वट आला तर आवडेल तुला ? त्या नवीन वटाची वटसावित्री व्हायला आवडेल ? " 

ती  - " काहीही काय बोलतोस मी ह्याचं जन्मी काय पुढच्या सातही जन्मी दुसऱ्या कोणाच्याही वट सावित्री होणार नाही . मी फक्त आणि फक्त तुझीच वट सावित्री आहे आणि मला शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच वट सावित्री म्हणून रहायचं . तुझ्याच नावाचं सौभाग्यच लेण लेवूण मिरवायच आहे . "

तो - " काळाच्या ओघात मी असेल नसेल तेव्हा " 

ती -" काळाच्या ओघात तू असेल नसेल तेव्हाही मी फक्त तुझीच असेन . फक्त तुझीच वट सावित्री . तू जे दिलं ना ते ह्या जगात मला दुसर कोणीही कधीच देऊ शकत नाही  "

तो - " मेघना मला blud cancer झालाय खूप कमी वेळ आहे माझ्याकडे मी तुझी साथ आयुष्य भर नाही देऊ शकत . आय एम सॉरी " 

ती - " काय बोलतोस तू आज काय झालय तुला ? असं का बोलतोस " 

तो - " हे खर आहे ग " त्याचे ते बोलून ऐकुन ती खूप रडते . पण त्याला तितक्याच खंबीरपणे आधारही देते .

ओके नो प्रोब्लेम आता तुला माझी साथ सोडायचीच आहे तर मी काय बोलू शकते . "तिला तिचे अश्रू अनावर झाले . ती खूपच बेचैन झाली .त्याने  तिला मिठीत घेतले आणि दोघेही खूप रडले . 

परत ती जराशी शांत झाली . "  ठीक आहे जोपर्यंत माझा वट माझ्या सोबत आहे . तोपर्यंत तो फक्त खुश राहणार प्रॉमिस . "  देवाने एक वट माझ्यापासून हिरावून घेतला . पण त्याचाच एक अंश माझ्या पदरात टाकला की मला नाही गरज नवीन वटाची . " 

"तू आणि तुझा अंश हेच माझं वट आहे . आणि हो ह्या जन्मी मी तुला जाण्याची परमिशन देते . पण पुढच्या साथही जन्मी ती परमिशन बिलकुल मिळणार नाही . तुझी वट सावित्री एवढ्या मोठ्या मनाची नाही रे ती तिच्या वटा शिवाय अपूर्ण आहे पूर्णपणे अपूर्ण तूच तिचं अस्तित्व आहे . आणि तूच तिचं आयुष्य ..." 

तो - " माहितेय ग मला मी पण माझ्या वट सावित्री शिवाय अपूर्णच आहे . माझी वट सावित्री  खरच खूप ग्रेट आहे. "

   " Hmm बास झालं सवित्रीच कौतुक चला आता आवरुया आयुष्याची एक नवीन सुरुवात करुया ... "

कथा पूर्णपणे काल्पनिक आहे . कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास निव्वळ योगायोग समजावा .














No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...