सुखदुःखाने ...
चांगल्या वाईट ,
अनुभवाने ...
त्यातच मी श्वास घेत ,
जगले स्वाभिमानाने ....
ही नित्याची पोस्ट राहुलने वाचली आणि तिच्याशी मैत्री करण्याची इच्छा त्याला झाली ..........
पण मनाला काही पटेना त्याने तिला स्वतःहून मेसेज करायला हवा . असं वाटेना कारण एकच atitude खूप atitude आणि खूप इगो असं त्याचं व्यक्ती महत्त्व ... इच्छा असूनही तो व्यक्त करत नव्हता ...
याउलट नित्या ना इगो ना atitude सर्वांशी मैत्री करायला आवडायची . एकदम फ्री , प्रेमळ आणि शांत स्वभावाची जेवढी शांत तेवढीच चंचल .... ह्यामुळे कोणताही व्यक्ती तिच्याकडे सहज आकर्षित होत असे .
कोणत्याही व्यक्तीला खूप कमी वेळेत आपलसं करण्याचं गॉड गिफ्ट तिच्याकडे होतं . म्हणून की काय खूप जणांशी ती सहज concet झाली ... रक्ताच्या नात्यापेक्षा ही ऑनलाईन नाती तिला खूप जवळची आणि स्पेशल वाटू लागली ....
ही अनोळखी ऑनलाईन नाती तिला मिळाली ती प्रतिलीपी ह्या app वर ती त्या app ची खूप ऋणी आहे.
कारण ह्या aap वर येण्याआधीच तिच्या आयुष्यात खूप मोठी भयानक घटना घडली होती ...
कधाचीत ती भयानक घटना विसरण्यासाठीच ह्या प्रतिलीपीची किनार तिला मिळाली होती .
आणि त्या किनाऱ्याबरोबरच खूप सारी प्रेमळ माणस ही तिला मिळाली होती ....!!
सकाळ सकाळी तिचा फोटो पाहिला की बिनासाखरीची
चहाला ही गोडवा येतो ...राहुलची पोस्ट
ह्या पोस्ट ला तिने खूप छान रिप्लाय दिला ...
नित्या रिप्लाय - "मग आता साखरेचे खारकाने बंद झाले तरी चालेल ना तुम्हाला "😂😂😂😂😂
राहुल रिप्लाय - "नाही तस करून चालणार नाही .. माझ् धकेल पण बाकीच्यांच कसं होईल .."😂😂🤣🤣🤣
नित्या रिप्लाय - "अहो मग द्या की तुम्ही त्यांना फोटो बघण्याची आयडिया "🤣🤣🤣😂😂😂😂😂
राहुल रिप्लाय - "तस करून चालणार नाही ..नाहीतर डायबिटज चे पेशंट वाढतील ना " 😂😂🤣🤣🤣
इथे त्यांचा प्रश्न उत्तरांचा खेळ संपला ...एकमेकांना चांगलाच प्रतिसाद द्यायला ते लागले होते .
दुसऱ्या दिवशी फ्रेंडशिप डे तरीही तिने किंवा त्याने एकमेकांना happy friendship day केलेच नव्हते .
राहुल पोस्ट -
आज ज्या ज्या मुलींनी तुम्हाला हॅपी फ्रेंड शिप डे wish केलं नाही , समजून जा भावांनो त्या तुम्हाला रक्षाबंधन च्या दिवशी happy rakshabandhan wish 💯करणार . 🤣😂😂😂😂
नित्या रिप्लाय - " का भाऊ मित्र असू शकत नाही की मित्र भावाच कर्तव्य पार पाडू शकत नाही "
राहुल रिप्लाय - 💯💯💯टक्के असू शकतो ..जस्ट जोक ....
आणि मग नित्या हळूच राहुलच्या इनबॉक्स मध्ये happy friendship day म्हणून मेसेज टाकते ...
रिप्लाय येईल की नाही ह्याची जराही खात्री नव्हती ..
कारण तो तिला खूप आखडू आणि खडूस वाटतं होता .
पण थोड्या वेळाने आलाच मेसेज ......
Same to nitya
Happy friendship day 💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
तिने लगेच 😊😊😊smile simbol पाठवलं ...
त्यानेही तिला प्रतिसाद दिला .....
पण काय बोलावं आता त्याला सुचेना
त्यानेच विचारलं , " तुमचं रिअल नावं काय ? "
नित्या - अहो तुम्ही अहो जाहो नका करू अरे तुरे करू शकता एवढी ही काही मोठी नाही मी तुमच्यापेक्षा खूप लहान असेल . "
राहुल - " तुम्ही अहो जाहो करता ते चालत का ? तुम्ही पण अरे तुरे करा ."
नित्या - " हो चालेल मलाही अरे तुरे च आवडत "
राहुल -" क्या बात है ! बात तो बन गयी !!
नित्या -" हा हा बात बन गयी ! "😊😊😊😊😊
मग नंतर कमिनिकेशन सुरू झाल . रहायला कुठे नावं गाव. वैगरे वैगरे ....त्याचा स्वभाव तिला खूप आवडला होता . आणि त्यालाही नित्याचा स्वभाव इतर मुलींपेक्षा खूप वेगळा वाटला होता ... त्याला तिच्याशी मैत्री करण्याची इच्छा पुन्हा झाली होती ....
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नित्याने इनबॉक्स मध्ये good morning have a nice day ...
आणि खरतर कालच विचारायचं होतं . पण वेळ नाही झाला... सो आज विचारते ...
" Will you friendship with me " 💐💐💐🍫🍫🍫🍫☕☕☕☕😊😊😊😊😊🌹🌹🌹
काय वाटतं तुम्हाला हा atitude वाला राहुल करेल का नित्याशी मैत्री आणि केली जरी निभावेन का शेवटपर्यंत !
मलाही पडलेत प्रश्न बघुया ह्या प्रश्नांची उत्तर पुढील भागात .....
😊😊😊😊😊
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर कथा...👌👍💐🍫
ReplyDelete