वेदनेला फुंकर असावी ,
पहाट ती आता लवकर व्हावी ,
दुरावा मावळावा ,
पुन्हा प्रेम ऋतु बरसावा ....
वेदना माझी त्यालाच ठाऊक ,
ऐकुन दुःख किती व्हायचा भाऊक ,
सोनेरी किरण त्याच्या माझ्या प्रेमाची लुप्त झाली ,
पहाट ही ती आता ओसरली ,
रोज तो माझ्या मनाचा मी त्याच्या मनाचा ,
ठाव घेत असतो...
न बोलूनही हितगुज करत असतो ...
अबोल्या ने प्रेम अजुनही वाढले ,
पूर्वी फक्त सहवासात होतो ,
आता एकमेकांच्या मनात आहोत ,
जाणून ही अजाण राहिलो ....
अप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDeleteखूप छान 👌👌👌👌
ReplyDelete