ती सतत समाजापासून लपुन राहत होती . अंग अंग चोरुन घेत होती . लाज वाटायची तिला स्वतःची सतत येणाऱ्या घामाची दिवसातून तीन चार वेळा अंघोळ करायची शरीराची स्वछता ठेवायची . घामाचे प्रमाण कमी व्हावे ह्यासाठी खूप दवाखाने केले . पण फरक काही जाणवला नाही . डॉक्टरांनी लुबाडले ते वेगळचं .
बायका तिला बघताच नाकाला रुमाल लावायच्या तिच्या पासून दूर दूर पाळायच्या . नशीब सतत अंघोळ करत असल्यामुळे अंगाला दुर्गंधी नव्हती यायची , नाहीतर बायकांनी तर तिला कचरा पेटितचं टाकलं असतं .
ती त्रासाने तर त्रस्त होतीच पण त्याहूनही जास्त त्रस्त होती . लोक तिच्यासोबत जे वर्तन करायचे त्या वर्तनानी .
सतत लोकांचे टूमणे बघताच नाकाला हात लावणं हे ह्याचं तिला खूप वाईट वाटायचं . मग तिनेच ठरवल लोकांमध्ये मिसळायचं नाही . आणि ती गावापासून खूप दूर एका माळरानावर राहू लागली . एका झोपडीत एकटीच बिचारी एकटेपणाचा तिला खूप कंटाळा आला होता. म्हणून ती change मिळावा म्हणून टेकडीवर चडून
निसर्ग सौदर्य बघाण्यासाठी म्हणून जाते . तर तिथे तिला एक सुंदर पुरुष भेटतो .
तो दिसायला खूप सुंदर होता , ती बघता क्षणी त्याच्यावर भाळली . ती ही सुंदर होती . सतत येणारा घाम ह्यामुळे तिची सुंदरता लोकांनी नजरेआड केली होती . तो तहानेने व्याकुळ झाला होता . पाणी मिळेल ह्या आशेने भटकत होता . तेवढ्यात ती त्याला दिसली आणि तो तिला विचारू लागला , " इथे कुठे पाणी मिळेल का ? "
" हो हो मिळेल जरूर मिळेल . पण इथे नाही टेकडी उतरून खाली जावं लागेल . येता का माझ्या बरोबर मी पाजते तुम्हाला पाणी "
त्याला खूप तहान लागलेली होती त्यामुळे तो नाही म्हणू शकला नाही . तिच्याबरोबर तो पाणी पिण्यासाठी तिच्या झोपडीत गेला . पाणी वैगरे प्याला आणि न राहवून त्याने विचारलं , " तुम्ही इथे माळरानावर एकट्याच राहता का ?"
" हो मी एकटीच राहते आणि ती तिच्या आयुष्याची कहाणी त्याला सांगते . आणि तिचे डोळे पाण्याने भरून येतात . अंग घामाने भिजून गेलं होत. ती सांगता सांगता पूर्णपणे खचून गेली होती . तिला धीर द्यावा . म्हणून हा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो .
त्याने हात लावताच तिच्या अंगातून निघणाऱ्या प्रत्येक घामाच्या थेंबाचे हिरे व्हायला सुरुवात झाली. घामातून निघणाऱ्या थेंबाचे हिरे व्हायला लागले ह्याचे त्यांना कुतूहल वाटायला लागले . त्याने तिच्या अंगाला लावलेला हात काढला . बाहेर पडणारे हिरे आपोआप गुप्त झाले .
त्याने परत हात लावला परत हिरे बघायला मिळाले .
असं बराच वेळ चालू राहील . मग तो तिला हसत म्हणतो तू तर हिऱ्यांची खान आहेस . लग्न करशील माझ्याशी .
तिलाही तो आवडला होता म्हणून नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता . ती ही हसत हो म्हणते पण अरे माझ्या अंगाला किती घाम येतो. तरीही तू मला लग्नासाठी विचारतोस .
अग " तुझ्या प्रत्येक घामाच्या थेंबाची किंमत एक हिरा असेल तर का नाकारू मी तो . "
आणि काहीचं दिवसात त्यांचं लग्न होत जिथे झोपडी होती तिथे मोठा राजवाडा जन्म घेतो . आणि त्यांच्या सुखी संसाराला हातभार लावतो .
काल्पनिक कथा आहे कोणीही वास्तविकता मानू नये .
छान लिहिलय
ReplyDeleteअतिशय सुंदर रंगवली आहे अप्रतिम
ReplyDeleteखुप सुंदर कथा...👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👍
ReplyDelete