नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 8, 2021

घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत एक हिरा

ती सतत समाजापासून लपुन राहत होती . अंग अंग चोरुन घेत होती . लाज वाटायची तिला स्वतःची सतत येणाऱ्या घामाची दिवसातून तीन चार वेळा अंघोळ करायची शरीराची स्वछता ठेवायची . घामाचे प्रमाण कमी व्हावे ह्यासाठी खूप दवाखाने केले . पण फरक काही जाणवला नाही . डॉक्टरांनी लुबाडले ते वेगळचं .

बायका तिला बघताच नाकाला रुमाल लावायच्या तिच्या पासून दूर दूर पाळायच्या . नशीब सतत अंघोळ करत असल्यामुळे अंगाला  दुर्गंधी नव्हती यायची , नाहीतर बायकांनी तर तिला कचरा पेटितचं टाकलं असतं .

ती त्रासाने तर त्रस्त होतीच पण त्याहूनही जास्त त्रस्त होती . लोक तिच्यासोबत जे वर्तन करायचे त्या वर्तनानी .

सतत लोकांचे  टूमणे बघताच नाकाला हात लावणं हे ह्याचं तिला खूप वाईट वाटायचं . मग तिनेच ठरवल लोकांमध्ये मिसळायचं नाही . आणि ती गावापासून खूप दूर एका माळरानावर राहू लागली . एका झोपडीत एकटीच बिचारी एकटेपणाचा तिला खूप कंटाळा आला होता. म्हणून ती change मिळावा म्हणून टेकडीवर चडून
निसर्ग सौदर्य बघाण्यासाठी म्हणून जाते . तर तिथे तिला एक सुंदर पुरुष भेटतो .

तो दिसायला खूप सुंदर होता , ती बघता क्षणी त्याच्यावर भाळली . ती ही सुंदर होती . सतत येणारा घाम ह्यामुळे तिची सुंदरता लोकांनी नजरेआड केली होती . तो तहानेने व्याकुळ झाला होता . पाणी मिळेल ह्या आशेने भटकत होता . तेवढ्यात ती त्याला दिसली आणि तो तिला विचारू लागला , " इथे कुठे पाणी मिळेल का ? "

" हो हो मिळेल जरूर मिळेल . पण  इथे नाही टेकडी उतरून खाली जावं लागेल . येता का माझ्या बरोबर मी पाजते तुम्हाला पाणी "

त्याला खूप तहान लागलेली होती त्यामुळे तो नाही म्हणू शकला नाही . तिच्याबरोबर तो पाणी पिण्यासाठी तिच्या झोपडीत गेला . पाणी वैगरे प्याला आणि न राहवून त्याने विचारलं , " तुम्ही इथे माळरानावर एकट्याच राहता का ?"

" हो मी एकटीच राहते आणि ती तिच्या आयुष्याची कहाणी त्याला सांगते . आणि तिचे डोळे पाण्याने भरून येतात . अंग घामाने भिजून गेलं होत.  ती सांगता सांगता पूर्णपणे खचून गेली होती . तिला धीर द्यावा . म्हणून हा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो .
त्याने हात लावताच तिच्या अंगातून निघणाऱ्या प्रत्येक घामाच्या थेंबाचे हिरे व्हायला सुरुवात झाली. घामातून निघणाऱ्या थेंबाचे हिरे व्हायला लागले ह्याचे त्यांना कुतूहल वाटायला लागले . त्याने तिच्या अंगाला लावलेला हात काढला . बाहेर पडणारे  हिरे आपोआप गुप्त झाले .
त्याने परत हात लावला परत हिरे बघायला मिळाले .
असं बराच वेळ चालू राहील . मग तो तिला हसत म्हणतो तू तर हिऱ्यांची खान आहेस . लग्न करशील माझ्याशी .
तिलाही तो आवडला होता म्हणून नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता . ती ही हसत हो म्हणते पण अरे माझ्या अंगाला किती घाम येतो. तरीही तू मला लग्नासाठी विचारतोस .
अग " तुझ्या प्रत्येक घामाच्या थेंबाची किंमत एक हिरा असेल तर का नाकारू मी तो . "

आणि काहीचं दिवसात त्यांचं लग्न होत  जिथे झोपडी होती तिथे मोठा राजवाडा जन्म घेतो . आणि त्यांच्या सुखी संसाराला हातभार लावतो .

काल्पनिक कथा आहे कोणीही वास्तविकता मानू नये .


4 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...