माझ्या मनी उमटवला त्याचा ठसा ,
शिक्षणाची आवड मला भारी ,
असूसुक्षित समाज अनेकांचे जीवन मारी ,
अज्ञान नको समाज ,
नाही त्याला मान आज ,
शिक्षण आहे पुस्तकांचे माहेर ,
पुस्तक आहे भविष्याचे आहेर ,
शिक्षणा मुळे समाज हा सुधारेल ,
पुस्तकासाठी नतमस्तक तो होईल ,
शिक्षण मिळेल तिथे जावे ,
पुस्तकानेच मन माझे मोहे ,
पुस्तकात भेटतात अनेकांच्या जीवन कथा ,
शिक्षणांमुळेच दूर होतात अनेकांच्या व्यथा ,
शिक्षण हे पुस्तकां शिवाय अपुरे ,
पुस्तक होतात कल्पनाशक्तीने पुरे ,
पुस्तकांना देते मी खूप महत्त्व ,
शिक्षणामुळेच वाढेल माझे कर्तृत्व .....
खूप छान रचना...👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम खुप सुंदर रचना
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना , पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे.
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDelete