गुंज मनीचे जाणून घेणा ,
सांजवेळी ह्या ,
चोचीच्या दवावर फुंकर घाल ना ,
ती वाट पाहते रे
घरट्यात एकटी ,
बिचारी चिमणी ,
नको रे छळू तिला ,
जीव आला बघ तिचा मेटाकुटीला ,
तू जातो वनसफारीला ,
सोडून एकट्या चिमणीला ,
ती बघ कशी हिरमुसून गेली ,
तुझ्या आठवणीने व्याकुळ झाली .......
आता बास झालं ,
तिचं मन जाणून घेना ,
तुझ्या प्रेमाचा ओलावा जरा तिला देना ......
खूप सुंदर रचना ...✍️👍👌🍫🌹
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteNice👌
ReplyDelete