आयुष्य आपल दोन क्षणाच कधी संपेल सांगता येणार नाही. त्यामुळे जे काही आयुष्य मिळालं आहे ते आनंदाने जगावं . द्वेष , तिरस्कार , मत्सर ह्याला आळा घालावा .
कोणालाही आपल्या मुळे त्रास होणार नाही . ह्याची काळजी घ्यावी . लोकांच्या चुका दाखवण्यासाठी पुढाकार नसावा तर , त्यांना चुका समजावून सांगण्यासाठी पुढाकार घ्यावा . चुकांवर हसू नये तर , तू आज चुकलिस
ह्यानंतर चुकणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घे. हे महत्त्वाचे बोल समजाऊन सांगण्यासाठी पुढाकार घ्यावा .
ओंजळ जरी रिकामी असेल , तरी दान करण्याची कुवत असावी , हीच तर असते खरी माणुसकीची निशाणी ती जिवापाड जपावी .
देह लाभला तो झिजवण्यासाठी काबाड कष्ट करण्यासाठी त्याला झिजवाव , त्याला रापवाव आयुष्य आपलं काळया मातीसंग नातं जोडतं जोडतं जगावं .
कोमल मनाने असंख्य मन जिंकून घ्यावी , आपल्या उपस्थितीत नाही तर , आपल्या अनुउपस्थित त्यांच्या तोंडून आपली कौतुक व्हावी . अशी आपली कहाणी असावी .
कोणी आपला तिरस्कार केला तरी आपण त्यांच्यावर प्रेम करावं . तिरस्काराला टक्कर म्हणून प्रेम वर्षाव करावा .
क्षणात परकेपणा देणारे खूप जण असतात . जे परकेपणा देतात ना त्यांना नेहमीच आपलेपणा देणारी मन श्रीमंती असावी .
स्वाभिमान असावा अहंकार नाही . सॉरी ह्या शब्दाने अनेकवेळा तुटलेली नाती जोडली जातात . म्हणून एकदा नाहीतर हजार वेळेस सॉरी बोलण्याची तयारी असावी .
जिद्द असावी चिकाटी असावी जगण्याची कला असावी ,
अभिमान वाटावा अशी आपली कामगिरी असावी .
जगात येऊन फार काही चांगली कामं केली नाही तरी चालेल , पण वाईट कामं करू नये .
किती छान विचार 😊👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर विचार प्रकट केले आहे लेखनातून👌👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर विचार दुर्गाताई
ReplyDeleteखुपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteछान विचार 👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteसुंदर लिखाण आत्मसात करावे असेच आहे..!👌
ReplyDeleteखूप खूप शुभेच्छा नवरात्र महोत्सवाच्या..!🌷
आबा 🙏
अतिशय सुंदर...
ReplyDeleteKhup chan lekh
ReplyDeleteछान लिहिलंय!������
ReplyDelete