नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 7, 2021

आयुष्य दोन क्षणाचे

आयुष्य आपल दोन क्षणाच कधी संपेल सांगता येणार नाही. त्यामुळे जे काही आयुष्य मिळालं आहे ते आनंदाने जगावं . द्वेष  , तिरस्कार , मत्सर ह्याला आळा घालावा .
कोणालाही आपल्या मुळे त्रास होणार नाही . ह्याची काळजी घ्यावी . लोकांच्या चुका दाखवण्यासाठी पुढाकार नसावा तर , त्यांना चुका समजावून सांगण्यासाठी पुढाकार घ्यावा . चुकांवर हसू नये तर , तू आज  चुकलिस
ह्यानंतर चुकणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घे. हे महत्त्वाचे बोल समजाऊन सांगण्यासाठी पुढाकार घ्यावा .

  ओंजळ जरी रिकामी असेल , तरी दान करण्याची कुवत असावी , हीच तर असते खरी माणुसकीची निशाणी ती जिवापाड जपावी .


देह लाभला तो झिजवण्यासाठी काबाड कष्ट करण्यासाठी त्याला झिजवाव ,  त्याला रापवाव आयुष्य  आपलं काळया मातीसंग नातं जोडतं जोडतं जगावं .

कोमल मनाने असंख्य मन जिंकून घ्यावी , आपल्या उपस्थितीत नाही तर , आपल्या अनुउपस्थित त्यांच्या तोंडून आपली कौतुक व्हावी . अशी आपली कहाणी असावी .

कोणी आपला तिरस्कार केला तरी आपण त्यांच्यावर प्रेम करावं . तिरस्काराला टक्कर म्हणून प्रेम वर्षाव करावा .

क्षणात परकेपणा देणारे खूप जण असतात . जे परकेपणा देतात ना त्यांना नेहमीच आपलेपणा देणारी मन श्रीमंती असावी . 

स्वाभिमान असावा अहंकार नाही . सॉरी ह्या शब्दाने अनेकवेळा तुटलेली नाती जोडली जातात . म्हणून एकदा नाहीतर हजार वेळेस सॉरी बोलण्याची तयारी असावी .

जिद्द असावी चिकाटी असावी जगण्याची कला असावी ,
अभिमान वाटावा अशी आपली कामगिरी असावी .

जगात येऊन फार काही चांगली कामं केली नाही तरी चालेल , पण वाईट कामं करू नये .



11 comments:

  1. किती छान विचार 😊👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर विचार प्रकट केले आहे लेखनातून👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खुप सुंदर विचार दुर्गाताई

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  7. छान विचार 👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  8. सुंदर लिखाण आत्मसात करावे असेच आहे..!👌
    खूप खूप शुभेच्छा नवरात्र महोत्सवाच्या..!🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर...

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...