नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 3, 2021

अपेक्षा नाही ठेवायची

निर्धार हा माझा एवढाच आहे ,

अपेक्षांचा डोंगर दुर्गम आहे ,

भावना मनात सखोल रुजलेल्या ,
पाणावलेल्या डोळ्यांत आसुसलेल्या ,

अपेक्षा काहीचं नाही ,
ठेवून काही फायदाच नाही ,
अपेक्षा पूर्ण करण्याचा कोणी वायदाच केला नाही ,

निर्धार हा माझा एवढाच आहे ,
लोकांच्या डोळ्यांत खुपेल एवढं खुश रहायचं ,
आयुष्यातील दुःख कोणासमोर नाही बोलायचं ,
सुखामागे धावत असताना ते विसरायचं ,

एकदा बोलून एक नातं दूरावलं ,
अजुनही नाही जोडल्या गेलं ,
आता परत तिचं चूक नाही करायची ,
कोण कडूनही कसलीच अपेक्षा नाही ठेवायची ...

5 comments:

  1. व्वा..खूपच सुंदर लिहिलय..चांगले विचार👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदरच 👌👌👌

    ReplyDelete
  3. खुप छान अप्रतिम

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...