ती आज खूप निराश होऊन घराबाहेर पडली होती . रिलॅक्स होण्यासाठी म्हणून कोणत्यातरी मंदिरात जाणार होती . सोबतीला म्हणून तिच्या एका मैत्रीनीला घेऊन जाणार होती .
अंगावर जरीच लुगडं कपाळावर भला मोठा
बुक्का चेहऱ्यावर आड्या पडलेल्या त्याही सुरकुतकेल्या रंगाने गोरी गोरी पान साधारण ६५वर्षाची असेन . ती म्हातारी रागारागात घराबाहेर पडली . काय विषय झाला होता काय माहित पण , तो विषय झाला . तेव्हापासून म्हातारी मात्र उदास होती . दोन लेक एक मुलगी अशी तिची फॅमिली होती . मुलांचे लग्न झालेलं दोन्हीही मुलांचे नातवंड हिने आपल्या अंगा खांद्यावर घेऊन वाढवले होते .
सूनांना सूना नाहीतर लेकी मानून वागवलं होतं . तरीही आज त्यांनीच ह्या विषयाला वाचा फोडली . हेचं तिच्या मनाला खूप लागलं होतं . कळून चुकलं होतं शेवटी लेक ती लेक असते आणि सूना त्या सूनाच असतात . सासूने कितीही केलं तरी ते कमीच पडतं . अशी शिकवण देत ती स्वतः ला समजवत होती . चेहऱ्यावरचे भाव सारे मावळले होते . दुःख लपवता येत नव्हते .
वसुंधरा म्हणजे वसू तिची जिवाभावाची मैत्रीण , सतत तिला विचारतं होती , " कमले बोल ना काय झालं . तू एवढी उदास का ? काही दुखतेय का ? काही खुपत का ?
बोल ना ग अशी गप्प नको राहू माय मनातल्या मनात नको कोलमडू बोल माझी बाय काय झालं . "
कमला - " वसू काही नाही गं असच सूना बरोबर थोडा वाद झाला . "
वसू - " वाद का कोणत्या कारणांवरून , तू तर वाद घालण्याऱ्यातील नाही . "
कमला - " हो ग त्यांना लेकीच समजते , पण आज कळून चुकले शेवटी लेक ती लेक्च असते . आणि सून ती सूनच सून लेकीची जागा कधीच घेऊ शकत नाही . जोवर त्यांचं ऐकल तोवर आपण त्यांना हवो असतो . त्यांच्या मनासारखं नाही वागलो तर , मग घराची मालकीण असून सुद्धा आपल्या हाल कुत्रे देखील खात नाही . "
वसू कमला च्या तोंडावर हात लावून , " काय बोलतेस तुला कळतय का काही . काय झालं सांग ना सविस्तर . '
कमला - " सांगते आधी दर्शन घेऊ आणि मग चालेल "
वसू - " हो "
दोघेही दर्शन वैगरे घेत्या आणि मस्त पिंपळाच्या ओट्यावर जाऊन बसतात . कमला आजी सांगायला सुरुवात करतात .
" वसू कान नीट देऊन ऐक माझं सारं बोलण संपल्यानंतर बोल , मध्येचं बोलली तर मग मी पुढचं काही बोलू शकेल की नाही माहीत नाही . "
वसू " बरं बाई माझी आई तुझ बोलणं होई पर्यंत मी काहीच नाही बोलणार बोल . "
कमला - " वसू ही तुझी आणि माझी शेवटची भेट ह्या नंतर मी कुठे असेन काय करत असेन माझ मला च नक्की काही माहीत नाही . पण एक नक्की जिथे असेन तिथे माझं असं कोणीच नसेन हक्काचं तिथे मी अनाथ म्हणून असेन . पोरं फॉर्मलीटी म्हणून पैसे पाठवतील . पण कधी भेट देतील की नाही माहीत नाही . मी ह्यानंतर तुला आणि माझ्या लेकरांना डोळे भरून पुन्हा पाहू शकेल की नाही माहीत नाही . " आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
वसू जाणून ही अजाण होती , " पळून बिळून चालली की काय ह्या वयात . "
कमला - " वसू काय ग हे कळूनही न कळ ल्यासारख बोलतेस . "
वसू - " मग काय करणार तुझ खूप चालत ना माझ्या सूना माझे लेक बघ आता शेवटी त्यांनीही तुला वृध्द आश्रमाचे दरवाजे दाखवले ना . सांगत होते थोडी तरी प्रॉपर्टी तुझ्या नावावर ठेव . त्या लालचे ने तरी तुझा सांभाळ केला असता . पण तू सगळं त्यांच्या बोडक्या वर घातलं . आणि त्यांना डोक्यावर बसवलं . आता तू काही चं नाही करू शकत ग , तुला सनाथ असूनही अनाथ व्हावं लागेल "
कमला - " हो ग आणि ह्याचं गोष्टीचं. खूप वाईट वाटतं आहे . " आणि ती खूप खूप रडते . पदरी पडलं पवित्र झालं अस म्हणून तिच्यावर होणारा अन्याय स्वीकारते . "
शेवटी त्या दोघीही एकमेकींच्या गळ्यात गळे घालून खूप रडतात . वसू हळूच तिच्या कानात गुणगुणते कळली ग कमले तुझ्या मनातील वेदना ती माझ्याही डोळ्यांत सलायला लागली . " वेदना तशी आहे ग म्हातारपणात वृध्द आश्रमाचे दरवाजे जिला दाखवले त्या आईची . "
वडील धाऱ्या व्यक्तींनी एक नेहमी लक्षात ठेवा . तुमचे लेकी सुना तुमच्यावर कितीही प्रेम करत असले , तरीही तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावे कधीचं करू नका . शेवटच्या श्वासापर्यंत तीन हिस्याचे मालक तुम्ही स्वतः रहा आणि चोकंड हीस्याचा मालकी हक्क त्यांना द्या . आणि मग बघा ते तुम्हाला कधीचं अनाथ करणार नाही . ते तुमच्या प्रेमा खातर नाही तर , तुमच्या कडे असणाऱ्या तीन हिस्सा मालकी हक्क मिळावा ह्या आशेने ते तुमचा सांभाळ करतील .
कथा काल्पनिक तेवर आधारित आहे .
चुकीस क्षमस्व :
अप्रतिम सुंदर लिहिलय
ReplyDeleteसुंदर लेख!✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर, मार्मिक लेख 👌👌👌👌👌
ReplyDeleteComments होत आहेत 👌
ReplyDeleteआबा 🙏
खूप छान👌🏻👌🏻
ReplyDeleteअगदी खर आहे ....खूप छान बोध देणारी कथा...👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteBodh katha sunder
ReplyDeleteHello Nitya..!
ReplyDeleteकाहीच problem दिसत नाही !
सगळं ठिक चालत आहे..!
👌🌷
आबा 🙏