नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 4, 2021

प्रेम केलं की नाही माहीत नाही

तुझ्यावर प्रेम केलं की नाही माहीत नाही ,
पण  आदर मात्र जरूर केला ,
तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवला ,
नेहमीच माझ्याआधी तुझा विचार केला,
तुझ मन दुखेल असं कधी वागले नाही ,
तुला मणाच्या एका कोपऱ्यात मोलाचं स्थान दिलं ,
माझ्या मनातील गुपित तुझ्या मनात रोवली ,
तुझ्यासाठी मी  तुझी सावली झाली ,
तू थांबवावं म्हणून कधी नाही प्रयत्न केले ,
तुझ्या नकळत तुझ्यासाठी अश्रू मात्र टिपले ,
तू मला उन्हात सोडले ,
विरहाच्या हिंदोळ्यावर  तुझा भास ,

होताच अलगद हसले ,


तुला मणवण्याचे प्रयत्न अजुनही नाही संपले ,


कारण एकमेकांच्या डोळ्यात प्रेम साठलेले ,
मी पाहिले रे कधी ही न सरणारे ....



4 comments:

  1. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...