तुझ्यावर प्रेम केलं की नाही माहीत नाही ,
पण आदर मात्र जरूर केला ,
तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवला ,
नेहमीच माझ्याआधी तुझा विचार केला,
तुझ मन दुखेल असं कधी वागले नाही ,
तुला मणाच्या एका कोपऱ्यात मोलाचं स्थान दिलं ,
माझ्या मनातील गुपित तुझ्या मनात रोवली ,
तुझ्यासाठी मी तुझी सावली झाली ,
तू थांबवावं म्हणून कधी नाही प्रयत्न केले ,
तुझ्या नकळत तुझ्यासाठी अश्रू मात्र टिपले ,
तू मला उन्हात सोडले ,
विरहाच्या हिंदोळ्यावर तुझा भास ,
होताच अलगद हसले ,
तुला मणवण्याचे प्रयत्न अजुनही नाही संपले ,
कारण एकमेकांच्या डोळ्यात प्रेम साठलेले ,
मी पाहिले रे कधी ही न सरणारे ....
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDelete