नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 27, 2021

मैत्री

हा लेख काही स्पेशल मुलांसाठी किंवा मुलीनसाठीच नाही तर , सर्वांसाठी आहे . मैत्री कोणत्याही नात्यात असो ती मैत्री असते . कोणाच्यातरी येण्याने आपली मैत्री तुटेल एवढी कमकुवत मैत्री नक्कीच नसावी .
                       रुसवे फुगवे भांडण भरभरून असावे . पण अबोला आणि दुरावा नकोच मैत्रीत . अबोला धरला तर मग ती मैत्री कशी असेल ? बोलून भांडून मोकळं होण ही खरी मैत्रीची ओळख असते . सार मनात साचवून समोरच्याबद्दल मनात गैरसमजाची अडी धरून अबोला धरण त्याची विचारपूस न करण ही असते का मैत्री ?
माझ्या मते मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं - मैत्री हे एक असं नातं आहे जे वय जात - पात न बघता केलं जातं .
        मग ही मैत्री तात्पुरती का असावी ? कम्पल्सरी नाही असू शकत का ? मी अनेकदा पाहिलंय अक्च्युअली माझा exparience आहे . माझा ना एक खूप चांगला मित्र होता . भरपूर आहेत marid -  unmarid सगळ्यांसोबत मी फ्री आहे .
सारे जण ताई म्हणून हाक मारतात त्यामुळे ही आणि तसंही मला कोणत्याच मैत्रीत काही वावग वाटतच नाही .

( काल्पनिक आहे )
हा तर माझा एक मित्र होता . तो आणि मी खूप गप्पा मारायचो अगदी लग्न लागण्याच्या क्षणापर्यंत आम्ही एमेकांशी बोलायचो . फॅक्ट आहे बरं का ? रिमुवर अस काही नाही .   आमची जोडी तशी राधा कृष्णाची जोडी म्हणून ओळखली जायची  .  आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो , तो तर मी लहान असताना मला कडेवर घेऊन गावभर फिरायचा . माझ्या भातुकलितील तोच माझा भाऊला होता . मी स्वप्नातही विचार नव्हता केला त्याची आणि माझी मैत्री कधी तुटेल म्हणून ह्याचा ,
पण ज्याचा कधी विचार नव्हता केला तेच घडलं . आमची
मैत्री कायमची तुटली . मला खूप वाईट वाटलं एक चांगला मित्र गमावल्याच गिल्ट मनात राहील .

पण नंतर विषय सोडून दिला . जर मी एक चांगला मित्र गमवला तर , त्यानेही एक चांगली मैत्रीण गमावली की नुकसान दोघांचंही झालं . नात्याचा अपमान दोघांनीही  केला . एकमेकांशी बोलून दोघांनाही बर वाटायचं मैत्री ही
कधीचं बळजबरीने नव्हती केलेली . दोघांनीही स्वखुशीने केलेली होती .  मग एवढी सुंदर मैत्री होती तर , ती लग्नानंतर तोडण्याचं कारण काय होतं ? ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने मला कधीचं दिलं नाही . आणि मी ही कधि मागितलं 
नाही . ज्याला नात्याची परिभाषा कळली नाही , त्याला भावना तरी कशी कळेल . असं समजून सोडून दिलं आयुष्याला नवीन वळण मिळाल .

पण आजही मनात gilt आहे ह्या गोष्टीचं लग्न झालं म्हणजे , पूर्वीच्या नात्यांना काही महत्व नसत का ?
आपली बायको आज आली . मैत्रीण तर  हिच्या आधी  खूप दिवसांपासून होती . मग हिच्या येण्याने तिची किंमत लगेचच कमी कशी काय होते . ?

तिला तुम्ही डायरेक्ट रस्त्यावर पडेल असल्याची फिलिंग का देता ? कोणी अधिकार दिला असं वागण्याचा मानव जातीला हे शोभणार नाही हे , पाहिले गोष्ट सांगायची ठरली तर , एक स्त्री आणि पुरूष कधीचं मित्र - मैत्रीण असू शकत नाही . हे समाजाने गृहीत धरलं ही सर्वात मोठी खंत आहे . समाजाने हा विचार बदलला तर , खरचं खूप चांगल होईल . स्त्री - पुरुषांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे . हेच मला कळतं नाही . एक स्त्री आणि पुरुष चांगले मित्र असू शकतात . नक्कीचं असू शकतात .  पण भूरस्टलेला समाज हे  कधी मान्य करणार . हे समजत नाही हे ....!!!!

तुम्ही एखद्याशी मैत्री unmarid असताना केली असेल तर , प्लीज marid झाल्यानंतर ती मैत्री कधीच तोडू नका . कारण तुमची wife तुमच्या आयुष्यात येण्याआधी ती मैत्रीण तुमच्या आयुष्यातील  खूप महत्त्वाची place असते . मग ती दुसरी मैत्रीण आल्यानंतर लगेच निकामी कशी होऊ शकते .

प्लीज कोणाशीही मैत्री करण्याआधी विचार करा . की आपण ही मैत्री शेवट पर्यंत निभावू शकेन की नाही ह्याचा . टाइमपास म्हणून मैत्री करू नका . टाइमपास करायला ते काही मनोरंजनाचा साधनं नाही . भावनांनी भरलेलं जिवंत माणसाचं निरागस मन आहे .  ते पायदळी तुडवू नका .

टाइम पास म्हणून  माणसांचा वापर कधी ही करायचा नसतो . टाइम पास करण्यासाठी खूप गोष्टी अवेलेबल आहे . त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे . टाइमपास करण त्यांचा अधिकार माणसाने का हिरावून घ्यावा . प्लीज मैत्री कधीही तुटू देऊ नका कितीही विघ्न आले तरीही , कायमस्वरूपी टिकते तिचं खरी मैत्री असते .


7 comments:

  1. अतिशय सुंदर....

    ReplyDelete
  2. सुंदर लेखन केले ✍️👌👌

    ReplyDelete
  3. सुंदर लिहिलंय

    ReplyDelete
  4. खुप सुंदर लिहिले दुर्गा

    ReplyDelete
  5. अप्रतिम लिखाण केलंत. ..✍️✍️

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...