हा लेख काही स्पेशल मुलांसाठी किंवा मुलीनसाठीच नाही तर , सर्वांसाठी आहे . मैत्री कोणत्याही नात्यात असो ती मैत्री असते . कोणाच्यातरी येण्याने आपली मैत्री तुटेल एवढी कमकुवत मैत्री नक्कीच नसावी .
रुसवे फुगवे भांडण भरभरून असावे . पण अबोला आणि दुरावा नकोच मैत्रीत . अबोला धरला तर मग ती मैत्री कशी असेल ? बोलून भांडून मोकळं होण ही खरी मैत्रीची ओळख असते . सार मनात साचवून समोरच्याबद्दल मनात गैरसमजाची अडी धरून अबोला धरण त्याची विचारपूस न करण ही असते का मैत्री ?
माझ्या मते मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं - मैत्री हे एक असं नातं आहे जे वय जात - पात न बघता केलं जातं .
मग ही मैत्री तात्पुरती का असावी ? कम्पल्सरी नाही असू शकत का ? मी अनेकदा पाहिलंय अक्च्युअली माझा exparience आहे . माझा ना एक खूप चांगला मित्र होता . भरपूर आहेत marid - unmarid सगळ्यांसोबत मी फ्री आहे .
सारे जण ताई म्हणून हाक मारतात त्यामुळे ही आणि तसंही मला कोणत्याच मैत्रीत काही वावग वाटतच नाही .
( काल्पनिक आहे )
हा तर माझा एक मित्र होता . तो आणि मी खूप गप्पा मारायचो अगदी लग्न लागण्याच्या क्षणापर्यंत आम्ही एमेकांशी बोलायचो . फॅक्ट आहे बरं का ? रिमुवर अस काही नाही . आमची जोडी तशी राधा कृष्णाची जोडी म्हणून ओळखली जायची . आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो , तो तर मी लहान असताना मला कडेवर घेऊन गावभर फिरायचा . माझ्या भातुकलितील तोच माझा भाऊला होता . मी स्वप्नातही विचार नव्हता केला त्याची आणि माझी मैत्री कधी तुटेल म्हणून ह्याचा ,
पण ज्याचा कधी विचार नव्हता केला तेच घडलं . आमची
मैत्री कायमची तुटली . मला खूप वाईट वाटलं एक चांगला मित्र गमावल्याच गिल्ट मनात राहील .
पण नंतर विषय सोडून दिला . जर मी एक चांगला मित्र गमवला तर , त्यानेही एक चांगली मैत्रीण गमावली की नुकसान दोघांचंही झालं . नात्याचा अपमान दोघांनीही केला . एकमेकांशी बोलून दोघांनाही बर वाटायचं मैत्री ही
कधीचं बळजबरीने नव्हती केलेली . दोघांनीही स्वखुशीने केलेली होती . मग एवढी सुंदर मैत्री होती तर , ती लग्नानंतर तोडण्याचं कारण काय होतं ? ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने मला कधीचं दिलं नाही . आणि मी ही कधि मागितलं
नाही . ज्याला नात्याची परिभाषा कळली नाही , त्याला भावना तरी कशी कळेल . असं समजून सोडून दिलं आयुष्याला नवीन वळण मिळाल .
पण आजही मनात gilt आहे ह्या गोष्टीचं लग्न झालं म्हणजे , पूर्वीच्या नात्यांना काही महत्व नसत का ?
आपली बायको आज आली . मैत्रीण तर हिच्या आधी खूप दिवसांपासून होती . मग हिच्या येण्याने तिची किंमत लगेचच कमी कशी काय होते . ?
तिला तुम्ही डायरेक्ट रस्त्यावर पडेल असल्याची फिलिंग का देता ? कोणी अधिकार दिला असं वागण्याचा मानव जातीला हे शोभणार नाही हे , पाहिले गोष्ट सांगायची ठरली तर , एक स्त्री आणि पुरूष कधीचं मित्र - मैत्रीण असू शकत नाही . हे समाजाने गृहीत धरलं ही सर्वात मोठी खंत आहे . समाजाने हा विचार बदलला तर , खरचं खूप चांगल होईल . स्त्री - पुरुषांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे . हेच मला कळतं नाही . एक स्त्री आणि पुरुष चांगले मित्र असू शकतात . नक्कीचं असू शकतात . पण भूरस्टलेला समाज हे कधी मान्य करणार . हे समजत नाही हे ....!!!!
तुम्ही एखद्याशी मैत्री unmarid असताना केली असेल तर , प्लीज marid झाल्यानंतर ती मैत्री कधीच तोडू नका . कारण तुमची wife तुमच्या आयुष्यात येण्याआधी ती मैत्रीण तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची place असते . मग ती दुसरी मैत्रीण आल्यानंतर लगेच निकामी कशी होऊ शकते .
प्लीज कोणाशीही मैत्री करण्याआधी विचार करा . की आपण ही मैत्री शेवट पर्यंत निभावू शकेन की नाही ह्याचा . टाइमपास म्हणून मैत्री करू नका . टाइमपास करायला ते काही मनोरंजनाचा साधनं नाही . भावनांनी भरलेलं जिवंत माणसाचं निरागस मन आहे . ते पायदळी तुडवू नका .
टाइम पास म्हणून माणसांचा वापर कधी ही करायचा नसतो . टाइम पास करण्यासाठी खूप गोष्टी अवेलेबल आहे . त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे . टाइमपास करण त्यांचा अधिकार माणसाने का हिरावून घ्यावा . प्लीज मैत्री कधीही तुटू देऊ नका कितीही विघ्न आले तरीही , कायमस्वरूपी टिकते तिचं खरी मैत्री असते .
अतिशय सुंदर....
ReplyDeleteमस्त👌👌
ReplyDeleteछान लेखन 👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन केले ✍️👌👌
ReplyDeleteसुंदर लिहिलंय
ReplyDeleteखुप सुंदर लिहिले दुर्गा
ReplyDeleteअप्रतिम लिखाण केलंत. ..✍️✍️
ReplyDelete