स्पंदनात माझ्या बीज प्रितीचे रुजवून गेला ,
सुर काळजाचे छेडून गेला ,
सुंगध प्रीतीचा तो घेऊन आला ,
आसपास माझ्या दरवळू लागला ,
जसा अल्लड वारा काळजाचा ठोका चुकवी ,
सावळा रंग दिसे असा की त्यास दृष्ट लागावी ,
मर्द रांगडा गडी तो ,
सावळ्या रंगात शोभून दिसतो ,
त्याच्या नजरेचा बाण हृदयाला छेडतो ,
साद घातली त्याने मनाला ,
ओढ लावली ह्या आसवलेल्या तनाला ,
तुला बघण्यास व्याकूळ झालेल्या ह्या नयनाला ,
गंध सावळ्या सख्याचा मनास बिलगून गेला ,
स्पंदनात माझ्या बीज प्रितीचे रुजवून गेला ,
खुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteव्वा क्या बात है बोहोत खूब सुंदर अप्रतिम शब्द है
ReplyDeleteसुंदर रचना...!✍️������
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच लिहिलंय👌👌👌👌👌💐💐💐💐💐
ReplyDeleteसुंदर लेखन 👌
ReplyDeleteखूप छान....सुंदर काव्य...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete