भास की आभास ..
भास की आभास ..
ओळख तुझी माझी..
आहे कालचीचं ..
तरीही का वाटते ..
आहे ती युगान युगाची ...
तरीही ओळखीचा का ?
भासे मजला ...
द्वंद्व तुझ्या माझ्या नात्याचे...
न उमजे मला ...
आधीच काळजावर उमटलेले ...
अनोळखी तरीही.....
का आज ओळखीचे वाटले ...
सत्य की असत्य ..
ओळख की अनोळखी ..
काहीचं न उमजे मला ..
स्पर्शून जाता जीवाला ..
वेगळाच आनंद होई ह्या मनाला ..
चेहरा तुझा अनोळखी ..
हास्य तुझे ...
तू भास की आभास ..
तरीही ही वीण नात्याची ...
दुर्गा मते
सुंदर रचना
ReplyDeleteव्वा 👌
ReplyDeleteसुंदर रचना अप्रतिम भाव 👍