नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 27, 2023

आई शी मैत्री करून बघा

अन्न पूर्ण ब्रम्ह आहे....त्याचा अपमान कधीही कुणीही करू नये ...मला ही  भाजी आवडत नाही ..मला ती भाजी आवडत नाही ...मला हे नको खायला मला ते नको खायला ..ह्या सवयी माणसाला कुपोषित करतात .

.त्यामुळे आई ताटात जे वाढेल ते आपण प्रेमाने खावं ...अगदी चटणी मिरची ही तिने ताटात कधी वाढली ना तरीही ...

" हाहाहा .... आई काय चव आहे ग तुझ्या हाताला ..ह्या तिखट मिरच्याना ही तू माझ्या किती आवडीच केलं ..खरच आज ना मी रोजच्या पेक्षा एक घास शिल्लक च खाल्ला "

कधी तरी तोंडभरून मन मोकळं जेवतांना कौतुक करा आईच ...तुम्ही केलेल्या त्या प्रेमळ कौतुकाने तिच्या चेहऱ्यावर पसरणाऱ्या हास्याच एकदा निरीक्षण करा ..दिवस भर केलेल्या कामाचा तिला जो शिण आलेला असेल तो क्षणात पळून जाईल ..

ती कधी नाराज वाटली ना कधीतरी तिची मैत्रीण होऊन तिला तिचा प्रोब्लेम विचारा ...तिचं दुःख कधी आपल्याही कवेत घेण्याचा प्रयत्न करा ...आणि स्वतःच हकदार व्हा तिच्या प्रेमळ मिठीच ...


    जर आई आपली मिडल क्लास असेल ना...तर कधी तिला स्टॅंडर्ड रहायला शिकवा ..मिडल क्लास म्हणून हिं नवु नका .....


बऱ्याच मुलींना पाहिलंय मी ....


" आई प्लीज माझ्या मैत्रिणी समोर येत जाऊ नको ..लाज वाटते मला तुझी .."


असं म्हणताना ..


कधीतरी विचार करून बघावा ...तिला नसेल वाटली  का लाज आपल्याला जन्म देताना ..हे ऐकण्यासाठीच का तिने आपल्याला जन्म दिला ...निरोगी शरीवार जखमा करून घेतल्या.....


.हजारो हाड मोडली असतील तिची आपल्याला जन्म देताना ...मग आपण असं बोलून पांग फेडणार का त्याचे ..एकदा विचार करून बघावा ....


आई ही आई असते ...


तिच्या आयुष्यात ती आपल्या लेकराची जागा ..


दुसऱ्या कोणालाच देत नसते ..


आई ही आई असते ...


मिडल क्लास ...स्टॅंडर्ड अस काही नसते ..


आई ही आई असते ..


ती फक्त आपल्या लेकरांसाठी जगत असते ..


असतील तिची ही काही स्वप्न ..


घेतले का कोणी ते विचारण्याचे कष्ट ..

एकदा त्या आईशी
मैत्री करून बघा ..
तिच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करा ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...