सुख आयुष्याला लाभावे .
तुझ्या सावलीत जीवन हे सरावें ....
स्वप्न तू ही ह्याचं आशेने पहावे ..
माझ्यासाठी आयुष्य तुझे झिजावे ..
तुझ्या चरणाशी बांधू दे ..
संसार सुखाचा .....
तुझ्या कृपेने बरसू दे क्षण आनंदाचा ..
पूरव आई हट्ट हा तुझ्या लेकरांचा ..
प्रेमळ तुझे सुर ऐकु दे मला ..
अंगाईत तुझ्या एकरूप होऊ दे मला ..
ही तुझी चिमणी ..
मिठू मिठू बोलती ..
शब्द काळजातले रचनेत उतरवते ..
पुढच्या जन्मी ही देव बाप्पा ..
तुझ्याच पदरात मला घालेन ग !
ह्याचं आशेत मी जगते ..
तुझ्यासाठी ही कविता ही करते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.