बांधू दे आकाशी मला स्वप्नांचे घर ..
साथीला तू चल त्या घरी जीवनभर ..
दोघे जोडीने त्यात आनंद भरू ..
प्रत्येक क्षण हा फुलवून टाकू ..
भास होतील मला खूप सारे ..
तू उतरव त्यांना सत्यात न्यारे ..
लावू आपण आशेचे दिवे किनारी ..
सोबत माळवू आनंदाची मोर पिसारी ..
मी वाट बघेन तुझी उंबरठ्यावर ..
तू राज कर माझ्या मनावर ..
मी नाव कोरील माझ तुझ्या दिलावर ..
चल दोघे मिळुनी त्या आकाशी जाऊ ..
स्वप्नांचे घर नवे तिथे बांधू ....
दुर्गा मते
पूर्ण होवो तुझे स्वप्न.तथास्तू
ReplyDelete