नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 21, 2022

अंदाज नाही बांधता येत ...

चांगुलपणा मागे लपलेले विध्वंसक  चेहरे आपल्याला नाही ओळखता येत .

आपले आपले वाटणारे कधी शत्रू होऊन आपला घात करेन नाही सांगता येत ...

आजकाल डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न मला नेहमी पडत असतो . कारण डोळे झाकून विश्वास ठेवावा अशा व्यक्तींशी भेट होतंच नाही . झाली तरी काही काळापूरती जो पर्यंत आम्ही एकमेकींशी गोड आहोत तोपर्यंत ती गोड असते .  जेव्हा आमच्या त छोट्याशा कारणावरून वाद होतात ..तेव्हा ती लगेच कडू होते . जिवापाड जपलेला विश्वासाला कसा तडा गेला . हे  ही लक्षात येतं नाही .

असं म्हणतात कपड्यांचं कापड ओळखता नाही आलं तरी चालतं ..पण माणसं ओळखता आली पाहिजे .
कपडे

अडगळीत टाकण्याचा ऑप्शन असतो . माणसं अडगळीत टाकण्याचा ऑप्शन नसतो . पण इथे नेमक होतं चुकीचं .. कापडाची निवड आपण काही क्षणात करतो . त्याची कॉलीटी कशी ? त्याचा रंग कसा ? ते किती दिवसापर्यंत टिकेन ह्याचाही अंदाज आपण काही क्षणात लावतो . माणसं ओळखण्यात आयुष्याचं खर्चिकरन होतं .
तरीही माणसाच्या स्वभावाचा अंदाज नाही बांधता येत ...
दुर्गा मते

1 comment:

  1. व्वा छान व्यक्त झालीये.

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...