नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 3, 2022

परश्या गावचा खरा हिरा ...



सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ....


परश्या हा शेळी पालन करणारा मुलगा .. गरीब परिस्तिथी मुळे शिक्षण घेणं नशिबात नव्हत.  वडिलांच्या आयुष्यात जे  घडलं . तेचं सेम  ह्याच्याही आयुष्यात घडलं .
परश्याची आई तो लहान असतानाच देवाघरी गेलेली . 
वडील दारूच्या व्यसनाने पिडलेले .   त्यामुळे माय आजीचं परश्याचा सांभाळ करी .

परश्या ने आठवी पर्यंत घेतलं शिक्षण . आठवी नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागणार होतं. त्यामुळे लगेचच आठवी नंतर परश्याने शिक्षणाला पूर्ण विराम दिला .  आणि बापाने आजवर चालवलेला वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला ... शेळी पालन तो करू लागला ....

जरी त्याने  शिक्षण थांबवलं होतं . तरीही त्याचं शिक्षणावर खूप प्रेम होतं.  तसा तो शाळेत ही खूप हुशार नेहमी वर्गात पहिला यायचा . पण परीस्थिती मुळे त्याने शिक्षण थांबवलं . त्यांचं एकच स्वप्न होतं एक मोठं पोलीस ऑफिसर व्हायचं . 

        स्वप्न पूर्तीस सज्ज होण्याआधीच त्याचं स्वप्न कोलमडून पडलं . इवलस मन त्याचं जबाबदाऱ्याचं ओझ घेवून जगू लागलं ...

शाळा सोडल्यानंतर अर्थात त्याला शेळी पालन करण्याकडे लक्ष केंद्रित करावं लागलं . तो आणि त्याचे वडील दोघेही सोबतच त्या शेळ्या घेवून जवळचं असणाऱ्या एका टेकडीवर जायचे . शेळ्या ना ती टेकडी अगदी तोंडपाठ झाली होती . ह्यांनी शेळ्या एकदा सोडल्या म्हणजे , त्या पुढचा मागचा विचार न करता . डायरेक्ट ली त्या टेकडीवर जाऊनचं थांबायच्या . 
त्यामुळे त्या शेळ्यांच्या जास्त जास्त मागोमाग फिरावं ही लागतं नव्हत . नेहमीचं त्यांचं रूटीन ठरलेलं असल्या मुळे ते फार टेन्शन घेत नव्हते ...

        पण एके दिवशी जरा विचीत्र चं प्रकार घडला .   नेहमी प्रमाणे तर , त्यांनी शेळ्यांना सोडलं होतं . सर्वच शेळ्या छान पैकी चरत ही होत्या . तेवढ्यात एक शेळी टेकडी च्या खालच्या दिशेने जातांना परश्या ला दिसली . 
 
त्याचे वडील त्याला विचारू लागले , " परश्या एक शेळी कुठं रं ? " 

परश्या लगेच टेकडीच्या खालच्या दिशेने जाऊन ती शेळी घेऊन येतो . परश्या च्या वडिलांनी त्याच्या पाठीत एक थापड मारली . " पर श्या तुला कितीदा सांगितल रं तिकडं जायचं नाय म्हणून .." 

" का र बा ? " परश्या रडत रडत बाबांना विचारू लागला. "

" आर पोरा नाय जायचं तिकडं .. चांगली जागा नाय ती "

" आर बा तू एवढंच सांगतो . काय आय एवढं तिकडं ते तर सांग आधी.  "

" आर पर श्या . तिकडं राक्षसाचा राजमहल आहे . 
म्हणून म्हणतो . तिकडं नको रं जाऊ तू "  बा ..

" बरं बा आतापासून कधीचं नाही जाणार रं शब्द देतू तुला ..". परश्या ..

ठरलेलं रूटीन नेहमीप्रमानेच चालू राहील . एके दिवशी पर श्याच्या वडीलांना काहीतरी काम निघत.  त्यामुळे त्यांना बाहेर गावी जावं लागतं.  मग ते परश्याला म्हणतात.  " तू आणि सोयबा आज दोघे जन जा शेळ्या घेऊन त्या टेकडी कड " 

" बरं बा " असं म्हणून ते दोघेही शेळ्या घेऊन टेकडीकडे जातात.  परश्या आज नेहमी पेक्षा जलद चालत होता.  

" आर परश्या थांब की रं ..मला येऊन दे की र एवढा काय जोरात चालतोय रं " सोयबा त्याच्या मागे मागे चालत त्याला विचारत होता.  

" तू भी चाल की रं.  म्या कुठ अडवल " 

परश्याने पावलांचा वेग अजूनच वाढवला.  शेवटी आली ती टेकडी परश्याने आज शेळ्या मोकळ्या न सोडता बांधून ठेवल्या.  आणि तो टेकडीच्या खालच्या दिशेने चालू लागला . 

" आर परश्या तिकडं कुठं चालला रं तू  ? "  सोयबा ने परश्या त्याचा हात घट्ट पकडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता . 

परश्याने त्याच्या हाताला जोरात हीसका दिला .
" सोड महा हात तू थांब इकडं मी आलो लागलीच "
असं बोलून तो टेकडीच्या खालच्या दिशेने गेला.  
त्याच्या पाठोपाठ सोयब्याही गेला ..

ते अगदी टेकडीच्या पायथ्याशी गेले.  तिथे गेल्यानंतर त्यांचे डोळे दिपतील असा नजराना त्यांना दिसला. 

एक भव्यदिव्य राज महल . पूर्ण सोन मोहराने भरलेलं. 
पूर्ण शांतता पसरलेली . एक चुट पाखरुही नाही.  आत मध्ये ते दोघेच ..

" परश्या काय आहे रं हे ..". सोयबा 

" हो रं कोणाचा लक्ष कसं नाही रं गेलं " परश्या

" समदे राक्षसाच्या भीतीने दूर दूर पळायचे . " सोयाबा 

" ओहह रं ..." परश्या 

तेवढ्यात ते दोघे चालतं चालतं असताना त्यांना एका पारड्यात एक चिठ्ठी दिसली . त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेलं होतं. 

" ही मालमत्ता सर्व बुद्रुक वाडीची आहे.  माल धार राजाने ही मालमत्ता सर्व बुद्रुक वाडीला दान केलेली आहे . हे वाचून ते खूपच खुश झाले .
ते दोघे धावतच वाडीच्या दिशेने पळाले.  आणि हातात असणारी चिठ्ठी गावच्या पाटलांच्या हातात दिली.  ते पण ते वाचून खूपच खुश झाले.  

ती मालमत्ता गावात सर्वांना समप्रमाणात वाटण्यात आली . पण त्या चिठ्ठीत मेंशन केलेल्या प्रमाणे त्यातील
50 टक्के मालमत्ता ही परश्या ला देण्यात येती.  
कारण त्या चिठ्ठी मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं. 
जो कोणी ह्या मालमत्तेचा शोध घेईल. त्याचा हिच्यावर सर्वात जास्त अधिकार राहील. 

त्यामुळे गावातील लोकं ही 50 टक्के मालमत्ता ही परश्या च्या नावे करता ...

गावातील लोकं ही परश्याल गावचा हिरा म्हणून जाहीर करता .

ध्येय  , चिकाटी आणि निडर पना माणसाला कुठपर्यंत नेईल सांगता येत नाही.  संधी दरवाजावर नाही येत. ती
शोधण्यासाठी बाहेरचं पडावं लागतं ..

 






No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...