नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 3, 2022

नवीन सुरुवात करायची ...

एक नवीन सुरुवात करण कधीचं सोप नसत . खूप अवघड असतं . पुन्हा पहिल्यापासून सर्व सुरू करण खूपच अवघड . 

      आपण पूर्ण पने जेव्हा कोरा करकरीत कागद असतो . तेव्हा सुरुवात केलेली असते. मग त्या कागदावर किती तरी गोष्टी लिहून , रुजवून त्याला सजवलेलं असतं . 
तो कागद फाडून परत तेवढाच सजवन खरच सोप असतं का ? 

ह्याचं उत्तर नक्कीच नाही मिळेल . कारण खरच खूपच अवघड आहे . एक करकरीत कागद नव्याने शब्दांनी सजवन . 

तसचं असतं आपल्या नावाचं . आपण खूप कष्ट करून आपलं नाव कमावलेलं असतं . त्या नावावर कोणी एकदा शक घेतला ना . त्यावर शक घेणाऱ्या हजारो नजरा असतात . त्या आपण रोखू नाही शकत . 

आपण चूकीचो आहोत की नाही . हे फक्त आपल्याला माहीत असतं. पण समाजाचं काय ? त्यांच्या समोर तर आपण चुकीचोचं होऊन बसतो. चूक नसताना . 
त्यामुळें जिथे आपल्याला चुकीचं ठरवल्या गेलं. तिथून लगेच बाजूला व्हायचं . कारण आपण चुकीचं आहोत की बरोबर ह्याच्याशी जगाला घेणं देणं नसत. त्यांना तर फक्त 
आपल्या नावावर उडालेल्या शींतोड्या शी घेणं देणं असतं . आपल्याकडून ह्याच्या नावावर कसा शिंतोडा उडेल ह्याच्याशी . 

 त्यामुळे वेळीच बाजूला व्हायचं आणि एक नवीन सुरुवात करायची . कारण आपण खरे आहोत हे लोकांना समजावून सांगण्यात काहीचं पॉइंट नसतो . कारण लोक 
ते कधी स्वीकारतील असं मला वाटतं नाही . 

अनुभवाच्या पुस्तकातून ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...