नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 7, 2021

न्यूयॉर्कचा प्रिन्स ...

ही सदर कथा केवळ काल्पनिक तेवर आधारित आहे . कुठल्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .....

प्रेयसी , नाव ऐकून जरा गोंधळलो ना आपण सर्वजण ....
नाव तिने स्वतःच ठेवलेलं ...अठराव्या वाढदिवशी नव्याने नामकरण केलं . तिचं खरं नाव ...श्यामल ...नामकरण करून मग प्रेयसी झालं ...

" असं नाव का ग ठेवलं ? " 

   हा प्रश्न तिला चुकूनही कोणी विचारला ना , तर तिचं ठरलेलं उत्तर असायचं .

" माझ्या स्वप्नात ना अठराव्या वाढदिवशी न्यूयॉर्कचा प्रिन्स आला . मला त्याची प्रिन्सेस करून घेण्यासाठी . आणि त्यानेच मला  मग प्रेयसी हे नावं दिलं ..."

तिचं हे उत्तर ऐकून सगळेच अचंबित व्हायचे . तिला वेड्यात काढायचे . ती मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची . आणि त्या आभासी जगातील तिच्या न्यूयॉर्क च्या प्रिन्स ची आतुरतेने वाट बघायची . 

तिचे आई वडील तिच्यासाठी एवढे सुंदर सुंदर स्थळ शोधायचे . पण ती मात्र एकालाही होकार देत नव्हती .
शेवटी तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाचा विषय जरा बाजूला ठेवून दिला . 
"आणि तू शोध तुझ्या स्वप्नातील न्यूयॉर्क चा प्रिन्स हा सल्ला दिला . "

तिने ही हसून होकार दिला . मी शोधते माझा न्यूयॉर्क चा प्रिन्स ... तुम्ही नका काळजी करू . असं  म्हणत तिने तो सल्ला स्विकारला . 

स्वप्नाच्या जगात , 
शोधू लागली एक प्रेयसी ,
तिचा प्रिन्स ....

आसावलेल्या नयनात , 
तिच्या सजू लागली ,
स्वप्न प्रितीची ...

पहिल्या भेटीची ,
वाट बघू लागली ,
हरवलेल्या त्या एकांताची ...

प्रेयसी ती जगावेगळी ,
हट्ट धरून बसली ,
न्यूयॉर्कच्या प्रिन्स ची ,
प्रिन्सेस होण्याची ... 

न्यूयॉर्कच्या प्रिन्स च स्वप्न पडून तिला बरीच वर्षे झाली होती . स्वप्न अठराव्या वर्षी पडल होत . ती आता पंचविसित असेल . 
आई वडिलांनी  तिच्या समोर हात टेकले होते . तिच्या लग्नाचा विषयच त्यांनी बंद करून टाकला होता . 

तिच्याही साऱ्या मैत्रिणी ची लग्न होऊन साऱ्याना एक एक बेबी पण झालं होतं . ती मात्र वाट बघत होती . तिच्या न्यूयॉर्कच्या प्रिन्सची . 

वाट बघुन बघून ती ही थकली होती ,
व्याकूळ झालेल्या तिच्या नजरेला ,
पुन्हा पुन्हा समजावत होती ...
तो नक्की येईल ,
ह्या आशेवर ती जगत होती ...
आशा ची नेहमीच निराशा होत होती ...

काव्या प्रेयसी ची मोठी बहीण अमेरीकेत राहत होती . काही दिवसांसाठी इंडियात आली होती . प्रेयसीची
स्टोरी तिला थोड्या फार प्रमाणात माहीत होती . 
पण नक्की ती न्यूयॉर्क च्या प्रिन्स चीचं वाट का बघत आहे . ह्याची तिला काहीचं कल्पना नव्हती . 

ती इंडियात आल्यानंतर सर्वात आधी ह्याचं गोष्टीचा छडा लावणार होती . आणि ह्या वेळेस प्रेयसीच लग्न झाल्यानंतरच अमेरिकेत परत जाणार होती . ती तस ठरवूनच इंडियात आली होती . 

प्रेयसी आणि काव्याच बॉण्ड पहिल्यापासूनच खूप छान होतं . त्यामुळे त्या शक्यतो एकमेकांपासून कोणत्याही गोष्टी लपवून ठेवत नव्हत्या . 

संध्याकाळची 5 ते 6 च्या दरम्यान घरातील सर्वच मंडळी बाहेर फिरण्यासाठी गेली होती . 
गार गारवा पसरला होता . हवेच्या मंद झुळूका हेलकवण्या देत होत्या . काव्या आणि प्रेयसी घरात एकट्याच होत्या . 

प्रेयसी नेहमीप्रमाणे बालकणीमध्ये हेडफोन्स कानात घालून तिच्या आवडीचे गाणे ऐकत होती . काव्या ने त्या दोघींना साठी छान चहा बनवून आणला . 

कानातले हेडफोन्स काढत , " ताई तू कशाला बनवला स मला सांगितला असतं तर मी बनवला असता .  "

" राहू दे ग चालत ...तू नेहमीच बनवते आज माझ्या हातचा घेऊन बघ ...."

" Hmm ते पण आहे . "

" प्रेयसी थोड बोलायचं होतं तुझ्याशी बोलू शकते ना ."

" काय ग ताई . परमिशन काय मागतेस बोल की 
बिनधास्त "

" तू रागवनार नाहीस ना ? "

"नाही बोल बिनधास्त "

" तू न्यूयॉर्क च्या प्रिन्स स्वप्न कुठल्या बेस वर बघतेस ? 
न्यूयॉर्क च्या प्रिन्स पेक्षा इंडियाचा त ले प्रिन्स पण खूप छान आहे . "

" ताई नको ना तो विषय प्लीज "

" का नको कारण सांग . "

" नको "

" हो का नको , तेचं विचारतेय त्याचं कारण सांग "

" काय कारण सांगू तुला ."

"जे असेल ते "

" ताई काही दिवसांपूर्वी एक साधू आला होता , त्याने मला सांगितलं तुझ्या पत्रिकेत मोडा दोष आहे . तुझ लग्न होणार पंचवीस वर्षांनंतर ते ही न्यूयॉर्क च्या प्रिन्स शी . म्हणून मी न्यूयॉर्क च्या प्रिन्स ची वाट बघतेय . "

" पंचवीस वर्षांआधी नाही का येणार तो "

" येऊ शकतो . त्याच काय माहीत नाही . "

तेवढ्यात फिरायला गेलेले सारी मंडळी घरी परत येतात . 
काव्याला तिच्या न्यूयॉर्क च्या प्रिन्स ची मेन हकिकत कळते . 

रात्री जेवण वैगरे झाल्यानंतर काव्या तिच्या आई वडिलांना तिची स्टोरी थोडक्यात सांगते . आणि आता ह्याच्यावर उपाय काय ते ही सांगते . तो उपाय अमलात आणायला दुसऱ्याचं दिवशीपासून सुरुवात ही होते . 

प्रणव काव्याचा बेस्ट फ्रेंड आणि प्रेयसीचा लव्हर म्हंटल तरी हरकत नाही . पण तो तिचा लव्हर आहे . हे फक्त काव्यालाच माहीत होत . बाकी कोणालाही नाही . तो ही अमेरिकेत काहीचं दिवसांपूर्वी सेट्टल्ल झाला होता . त्यामुळे काव्या आणि प्रणव दोघेही कॉन्टॅक्ट मध्ये होते . 
काव्या आणि प्रणव दोघेही सोबत इंडियात आले होते .
दुसऱ्याच दिवशी काव्या प्रणवला कॉल करते . आणि भेटण्यासाठी त्याला तिच्या घरी बोलावते . न्यूयॉर्कचा प्रिन्स म्हणून .... तो ही येतो. तो येण्यापूर्वी काव्या तिला प्रेयसी ची गोष्ट सांगते ...... काहीही झालं तरी तू न्यूयॉर्कचा प्रिन्स बनुन प्रेयसीला पटवायच म्हणजे पटवायच . प्रेम करतोस ना तिच्यावर मग ते प्रेम आता सिध्द करून दाखवायचं ...
" ओके राणी सरकार " असं म्हणून लगेच पुढच्या पंधरा मिनिटातच तो तिच्या घरी हजर होतो . 

तो दरवाजाची बेल वाजवतो . दरवाजावर कोणीतरी बेल वाजवत आहे . हे लक्षात येताच प्रेयसी दरवाजा ओपन करण्यासाठी जाते .

गोरा गोरा त्याचा रंग ,
परम्यूनचा सुंगध ,
साद घालू लागला मनाला ..
आलिंगन देऊ लागला प्रेयसीच्या स्वप्नाला ...

बघताच क्षणी प्रेयसी त्याच्यावर भाळली ...त्याच्या त्या रुबाबदार छबी त तिला न्यूयॉर्कच्या प्रिन्स ची प्रतिमा दिसली . प्रतिमा ती अनोळखी पाहून प्रेयसी नाजूक हसली ...

" कोण आपण ? "

" मी प्रणव ...न्यूयॉर्क रहिवासी काव्या चा मित्र आहे ना ती घरात ..."

" ताईचा मित्र .. हो आहे ती घरात ..प्लीज वेलकम "

" हो ...thanks .."

" इट्स ओके all is well "

तेवढ्यात काव्या , " प्रणू तू कसा आहेस ? "

" मी मस्त तू कशी आहेस ? "

" मी एक नंबर मित्रा "
काव्या प्रणवला तिच्या आई वडिलांची ओळख करून देते . आणि प्रेयसी शी पण . "

त्यांचं बोलणं सुरु होत . प्रेयसीच सार लक्ष त्याच्याकडेच होत . ती त्याला चोरुन चोरुन बघत होती. काव्या ही अधून मधून तिच्याकडे बघत होती . बात बन गयी . असं म्हणत मनोमन खुश होत होती . थोड्याच वेळात प्रणव आता मी येतो असं म्हणत तो त्याच्या घरी जायला निघाला . 
प्रेयसी लगेच बालकणी मध्ये जाऊन उभी राहिली . त्याची आणि तिची नजर एक झाली हलकेच ती हसली . त्यानेही तिला स्मित केलं . तिने हात हलवत बाय केलं . त्यानेही तिला रिस्पॉन्स दिला . प्रीतीचा एक अनमोल धागा इथे नकळत जुळला . 

प्रणवच नेहमीच प्रेयसीच्या घरी येणं जाणं राहत होत . त्यामुळे गाठ भेट होतच होती . नकळत त्यांच्या प्रेमाची कळी फुलली ... काव्याच्या साथीने ती वेळोवेळी बहरत ही होती . ती ते दोघे एक कसे येतील ह्यासाठीच जास्त प्रयत्न करत होती . त्या प्रयत्नात ती यशस्वी ही होत होती .

प्रणव तिला प्रपोज का करत नाही . ह्या विचारात काव्या कधी कधी खूप गुरफटत होती . ती एक चांगलीच भांडली देखील प्रणव ला . तेव्हा त्याने तिला शांतते त सांगितलं .
" मी तिला कधीच प्रपोज नाही करणार . जर मी तिला स्वतःहून प्रपोज केल तर , ती मला चुकीचं ही समजू शकते . ती मला स्वतः हून प्रपोज करेन ह्यासाठी प्रयत्न मात्र नक्की करणार . "

काव्या लाही त्याचं बोलणं पटत . ती त्या ला बोलते . तू बोलतोस ते करेक्ट आहे . पण जरा लवकर प्रयत्न कर ."

" Hmm नक्कीच "

ज्या दिवशी काव्या आणि प्रणवच ह्या विषयावर बोलणं होत . त्याच दिवशी संध्याकाळी प्रेयसी त्याला प्रपोज करते . 
आणि त्याला विचारते , " लग्न करशील माझ्याशी तू माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस . माझा न्यूयॉर्क चा प्रिन्स ...मी फक्त तुझ्यासाठी बनले आणि तू ही फक्त माझ्यासाठीच बनला ....

" लग्न करशील माझ्याशी करशील का मला न्यूयॉर्क ची प्रिन्सेस खरी ...."

" हो नक्की करेन मी तुझ्याशी लग्न ...एक विचारू "

" हो विचार की "

" जर तुला उद्या कळलं मी न्युयॉर्क चा प्रिन्स नाही तर , काय करशील ...."

" कुठे काय काहीचं नाही करणार ."

" मग इतके दिवस का थांबलीस न्यूयॉर्कच्या प्रिन्ससाठी ."

" मनाला भावणारे आज पर्यंत कोणी मिळालं नाही . तू पहिला आहेस . ज्याच्यावर मी भाळले ."

" Ohh "

तेवढ्यात काव्या येते आणि " अरे व्वा ! मिळाला आज आमच्या प्रेयसी ला तिचा न्यूयॉर्क चा प्रिन्स खुश ना आता आमची प्रेयसी करशील ना लग्न प्रणवशी "

ती लाजत खाली निघून जाते . तिचे आई वडील पण खूप खुश असतात . कारण आज त्यांच्या लाडक्या लेकीला न्यूयॉर्क चा प्रिन्स मिळालेला असतो . थोड्याच वेळात प्रणव ला एक कॉल केला येतो . त्याच्या कंपनीतून प्रणव लगेच कॉल रिसिव्ह करतो . आणि एक न्यू गूड न्यूज मिळते . त्याची ट्रान्स्फर झाली आहे . ते ही न्यूयॉर्क मध्ये .

सगळेच जण खूप खुश होतात . शेवटी प्रेयसीला पडलेलं स्वप्न हे खरच होतं . तिच्या मनात जे होत तेच घडल . न्यूयॉर्क ने तिचं नशीब घडवलं होतं....न्यूयॉर्क मध्येच तिचं नांदन लिहिलेलं होतं ...

काहीचं दिवसात त्या दोघांचं लग्न होत . आणि ते कायमचे शिफ्ट होतात . न्यूयॉर्क मध्ये .... नवीन संसार थाटण्यासाठी नवीन आयुष्य घडवण्यासाठी....

मनापासून बघितेलेल स्वप्न होत पूर्ण नाही राहत कधीच अपूर्ण ....


दुर्गा मते ....



1 comment:

  1. खूप छान स्टोरी.. स्वप्नही कधी कधी खरी होतात..👍👌✍️👏👏🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...