रुढी परंपरा ह्यात अजुनही गुरफटलेल माझ् गावं .....
मुलींची स्वप्न ह्या गावात पूर्ण होतच नाही , हीच माझ्या गावाची मेन प्रथा ...पैशाने श्रीमंत विचारांवर खूपच दारिद्र्य पसरलेल ..व्यक्ती सुशिक्षित असो किंवा असुक्षित सर्वासाठी सेम सर्वांच्या नजरेत एकच रूल ......
मुली 10 पास आउट झाल्या 12 पास आउट झाल्या की लगेच त्यांचे दोनाचे चार हात केले जातात . मुलीला आज ही आमच्या भागात ओझ मानल्या जात . आणि प्रत्येक बाप ते ओझ लवकरात लवकर खाली करण्याच्या विचारात असतो .
मुलीची स्वप्न मृगजळ होऊन जातात , संसार करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला . हे त्या सहज स्विकारतात .
त्यांनीच नाही . हे मी पण स्वीकारलं आहे . मलाही ही शिकायचं होतं . लॉयर व्हायचं होतं . त्यादृष्टीने मी अभ्यास ही करत होते . 10 पर्यंत मी मनलावून अभ्यास केला . पण 10 पास आउट झाले . आणि लगेच माझ्या आई वडिलांनी माझ्या हातात माझ्या मनाविरुध्द सुई धागा दिला . आणि मग मी अभ्यासापासून दुरावले ती दुरावलेच अजुनही कनेक्ट नाही झाले . ऍड मिशन घेतलेलं आहे . ते नावापूरतचं अजुन कॉलेज कस आहे . कुठे आहे ते जाऊनही नाही पाहिलं .
माझे आई वडील माझ्या शिक्षनात इंटरेस्ट दाखवत नाही . ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत आहे .
रडणाऱ्या चे डोळे कसे पुसता येतील हे दाखवण्यासाठी त्यांनी मला ऍडमिशन घेऊन दिलं . नाहीतर त्यांची ईच्छा कधीच नव्हती मी बारावी नंतर ऍडमिशन घ्यावं . आणि पुढे शिकावं ...
पण माझ्या शिक्षकांनी केलं ऍडमिशन ते माझ भल व्हावं म्हणून, डिग्री तर जरूर मिळणार उद्या .
पण शिक्षणाशी आता कनेक्ट होण कधा चीत नशिबातच नाही . हे मला नुकतच कळलं . आणि मी शिक्षणाचा नाद सोडून दिला .
कारण माझी स्वप्न ह्या गावात कधीच पूर्ण होणार नाही . हे मला माहीत आहे . म्हणून मी आता कुठलच स्वप्न बघत नाही . एकच स्वप्न बघते एक चांगला लाईफ पार्टनर मिळावा . तेच माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न आहे . जे नियतीने बघण्याचा अधिकार तर ,दिला पूर्ण करण्याचा कधी मार्ग नाही दाखवला . आणि मी ही कधि तो शोधण्याचा प्रयत्न नाही केला .
जे नशिबात असेल ते घडणारच आहे . त्यामुळे मी तिथेही काही अपेक्षा नाही ठेवल्या आणि कधी ठेवणार पण नाही . कारण नेहमीच अपेक्षांचा अपेक्षाभंग च होतो .
माझ्या गावची परिस्तिथी खूप वेगळी आहे . इथे आजही मी सूनांना त्रास देणाऱ्या सासवा मी बघते . इथे आजही मुलींवर आजही बंधने घातली जातात . मुली आई वडी लां पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर , तिला ढा सपुस केली जाते ....
खूप गोष्टींना इथे मीच बळी पडलेली आहे . खूप घटना मनात खोलवर रुजलेल्या आहेत . ज्या मी आता कधीच बहरू देणार नाही . पण ते पूर्णपणे कधी कोलमडनेहीं शक्य नाही ...
नशिबाने आणि नियती ने खूप कमी वयात खूप सारे अनुभव दिले , कधाचीत त्यामुळेच मी एक लेखिका म्हणून नव्याने जन्मले ...
माझ्या गावची परिस्थिती खरच खूप भयानक आहे . सांगता येणं नक्कीच सोप नाही .....
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूपच छान..👌
ReplyDeleteवास्तविकता मांडली आहे.
💐💐💐💐💐💐💐💐
आबा
🙏