कयास बांधते आपल्या नात्याचे ,
गुपित सांगते मनातले ....
तुरे माझा पाठीराखा ,
सोबत असतो सावलीसारखा ...
नाते हे भावा बहिणीचे अनमोल ,
मनात मायेचे भाव सखोल ....
ओवाळीते आज तुला भाऊराया ,
जिवापाड ह्या बहिणीची तुजवर माया ..
असू दे साथ मला तुझी ,
मी रे लाडकी बहिण तुझी ....
कयास बांधते आज नात्याचे ,
गुपित सांगते मनातले ...
ह्या बहिणीच्या काळजातले ...
खोलवर ते क्षण रुजलेले ...
तुझ्या माझ्या प्रेमाचे ...
कयास बांधते नात्याचे ...
खुपच सुंदर रचना.... अप्रतिमच 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम 👌
ReplyDeleteसुरेख शब्द गुंफण ..!!👌
🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫
आबा 🙏
खुप सुंदर शब्दांकन... ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
ReplyDelete