तुझे स्मित पाहुनी ,
किती गेले अश्रू वाहुनी ..
जाणले का तू कधी ,
भाव माझ्या मनीचे ,
साक्ष देते माझ्या प्रेमाचे ..
ते पहिले तू कधी ?
हास्य तुझ्या चेहऱ्यावर ,
तेवत राहू दे ,
माझे आयुष्य माझ्या जोडीदाराला लाभू दे ,
सांगताना ऐकले का कधी ?
तुझ्यासाठी अश्रू किती घाळते ,
हास्य तुझे बघण्यासाठी नेहमीच तळमळते ,
ते पाहिलेस का कधी ?
मी जेवढं प्रेम करते ,
तेवढं तू करतोस का ?
मी विचारल का कधी ?
सांग ना माझ् मन तू ,
जाणलस का कधी ?
अप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteवाहह.. खुप सुंदर रचना... भावस्पर्शी...👌👍💐🍫
ReplyDelete