आयुष्याची पाऊल वाट ही ओळखीची असावी ,
त्यात नागमोडी वळणं नसावी ....
प्रवास अनोळखीच असतो ,
त्याला ओळखीचा करून घेण्यात जीवनाचा अंतिम क्षण येतो ....
सुख दुःख वाट्याला आलेले ,
पाणावलेल्या डोळ्यांत स्तब्ध झालेले ...
पाऊलवाटेने चालताना मी आनंदाचे शीखर गाठले ,
माझ्या आयुष्याचे नागमोडी वळणं बदलले ...
पाऊल वाटेने चालताना क्षण ते साठवले ,
मनात खोलवर रुजवले ..
नागमोडी वळणं येताच क्षणो क्षणी आठवले ...
आयुष्याची पाऊल वाट नव्याने चालले ...
Written by - durga mate
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete