नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 5, 2021

काहीही झालं तरी दूर पळायचं नाही ...

खूप दिवसांपासून मनात होतं ह्या विषयावर लिखाण करायचं . सो फायनली हा विषय हातात घेतला . तुम्हाला माझे विचार आवडतील की नाही माहीत नाही . पण मी मात्र लिहिणार आणि माझ्या विचारांना चालना देणार ....

गुंतन ...


एकाध्यामध्ये गूंतन खूप जीवघेणं असतं . खरच आहे ते ...


पण नात्याची ही एक कमिटमेंट असते .


कोणामध्ये किती गुंतायच हे आपल्याच हातात असतं . हो हे आपल्याच हातात असतं . एकाद्यामध्ये गुंतू नये म्हणून त्याच्यापासून दूर पळन हे काही मला पटण्यासारखं नाही .


अनेकदा दोघांचं कनेक्शन खूप छान असतं . पण कोणातरी एकाला वाटतं इथे विनाकारण गुंतून फायदा नाही . उगाच कशाला कोणा मध्ये गुंतायचं असं विचार करत , तो त्या व्यक्तिपासून दूर दूर पळू लागतो .


दोघांचं भल होईल ह्या उद्देशाने जरी तो दूर दूर पळत असला , तरी तो एक विसरून जातो .


आपण दूर दूर पळतोय ह्याचा समोरच्या व्यक्तीवर चुकीचा परिणामही होऊ शकतो . समोरच्याला वाईट ही वाटू शकत . एक क्षण असं ही वाटू शकत आपणच नातं निभवायला कुठेतरी कमी पडत आहोत . त्यामुळेच हा आपल्यापासून दूर दूर पळत आहे.


दूर पळणाऱ्याने एकदा तरी , समोरच्या व्यक्तीचा विचार करायला हवा . त्याच्या भावनांची कदर करायला हवी .


एकदा त्याचं मन समजून घ्यायला हवं . नाहीतर स्पष्टपणे सांगून टाकायला हव . मी तुझ्यात गुंतत चाललो आहे , आणि काहीही झालं तरी , मला कोनातही गुंतायच नाही . त्यामुळे आपल्या नात्याची एक कमिटमेंट हवी . असं त्या व्यक्तीला सांगायला हवं . कधाचीत समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेऊन प्रायवसी देईन .


आपल्यापासून आपणहून दूर ही होईल . दूर होणं शक्य नसलं तरी अशक्य नाही  . फक्त जराशी आपणही हिम्मत करायला हवी .


एकमेकांपासून दूर होण्यापेक्षा नात्याला पर्सनल स्पेस देणं केव्हाही चांगलं . दूर होऊन यातनेत जळण्यापेक्षा एकमेकांसोबत आनंदाने जगणं केव्हाही चांगलं .  आपण गुंतू ह्या भीतीने दूर पळण कधीचं योग्य ठरणार नाही . कारण आपण गुंततो त्याचं व्यक्तीत जी व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त आवडते . आणि आपण आपल्या आवडत्या व्यक्तीपासूनच दूर पळलो तर , मोकळा श्वास घेऊ शकतो का ? आनंदाने जगू शकेल का ? त्या व्यक्तीचा विचार करण खरचं बंद होईल का ? दूर पळल्याने ती व्यक्ती मनातून कायमची दूर होऊ शकेल का ?
अर्थात नाही ...मग कशासाठी दूर पळायचं .... एकमेकांसोबत राहून ते नातं नव्याने फुलू द्यायचं ...

चुकीस क्षमस्व :


1 comment:

  1. अतिशय सुंदर विचार मांडले,👌👌👌 सुंदर लेख.

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...