पाऊलवाट ही ओळखीची ,
नागमोडी वळणं ही माझ्या आवडीची ...
माझ्या शेताची रानावनाची ,
ओढ मला ती सफर पार करण्याची ...
नागमोडी वळणं लागता ,
फुलांचे अत्तर साद घालता ,
बोर , चिंच खेळायला बोलवता ...
वडाच्या सुरपारंब्या माझीच वाट बघतात ,
घानेरीची फुलंही माझ्या स्वागतासाठी उत्सुक असतात ..
आमचे बकरू कोकरू सगळेच मला पाहून आनंदी होतात ,
माझ्याबरोबर लपाछपीचा डाव खेळतात ...
No comments:
Post a Comment
Comments plz.