स्वर ते इतके मधुर होते ,
अमृतापरी गोड होते ...
चित्त माझे सारे वेधत होते ..
खुळी ती बोबडी भाषा साद घालत होती ...
अल्लड तिची अदा ओठांवर स्मित आणत होती ..
खट्याळ तिची नजर अनोळखी ,
भाषा ती मधाळ बोलकी ,
गंध फुलांचा सजली ती खास अबोली ...
लेक माझ्या ताईची ,
लाडली माझ्या दिलदार मनाची ,
जोडी खास तिची माझी ...
जशी जाई जुई ची तशी ह्या -
अनोख्या माय लेकीची ...
अतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteछान आहे जोडी मायलेकीची सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDelete