नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 1, 2021

फरफट तिच्या आयुष्याची

काय आयुष्य होत राणी सारखा दरारा होता . काम ना धाम नुसताच आराम आता मात्र रोज शेतात राबन मुक्या जनावरांवानी काम करन . आता चूल आणि मुल हेच तीच अस्तित्व ... 

सुखी आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवून तिने उंबरठा ओलांडला . आयुष्याचा प्रवास थांबला , की नव्याने सुरू झाला . हा प्रश्नच आता लुप्त झाला . घराचा कारभार हाती घेतला . श्वास तिचा तिथेच घुट मळू लागला . उंबरठ्या आत हेच तीन जगणं तीच स्वीकारलं . 

लग्न झालं खूप खुश होती . मनासारखा जोडीदार मिळाला होता . समजून घेणारा शिकलेला talented वयात खूप अंतर होत. त्याच्या सुंदर दिसण्याने ते झाकल गेलं होत . 

तिने शेतीत काम करण्याची स्वप्नच पहिली नव्हती. लग्न झालं की दोन महिन्यांनी पुण्यात शिफ्ट व्हायचं एवढंच काय ते तिला माहित होत . शेती नाव तिने कधी ऐकलच नव्हत. पण बिचारी च आयुष्य काय बोलू मनासारखं नाही घडल. आता काय करावं हे ही तिला सुचेना . लग्न लग्न आणि लग्न केलं आयुष्य खरचं बरबाद झाल . 

लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी माझ्याकडे आली . सहज विचारलं , " काय ग काही goodnews आहे का ? " 

" हे काहीही काय बोलतेस एवढ्या लवकर डोक्यावर पडली की " काय असं म्हणत मला गप्प केलं . मी ही नंतर काही नाही बोलले . 
तिचं बोलली अग आताच नाही घ्यायचा आम्हाला चान्स बघू दीड दोन वर्षांनी मग नक्की सर्वात आधी तुलाच सांगेन . मी बोलले ओके मला काय ...

परत आठवड्यांनी माझ्याकडे आली . चेहऱ्यावर असायला हवा तसा आनंद नव्हता . मनात पण चीलबीचल होती . 

मी तिला धीर देत विचारल , " काय झालं ? काही प्रोब्लेम कशी आहेस ? " 

तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मन तर आनंदाने भरलेलं होतं . पण मनाला ते काहीचं इतक्यात मान्य नव्हत .
तिनेच हळूच कानात सांगितल . 
" मी आई होणार आहे आणि तू मावशी ." 
मला तर आनंद झालाच होता . तिचं अभिनंदन केलं . 

" अग पण तू बोललेली ना एवढ्यात चान्स घ्यायचा नाही . मग अस कस . " 
त्यावर ती नाराज झाली . त्याला मी काय करू शकणार होते . झालं आता पहिलीच बाळं असल्यामुळे ते सासू सासऱ्याना पण हवेच आहे . माझं मत कोणीही विचारात घेतलं नाही . जे नशिबात होत ते स्वीकारलं मी . 
आता माझ आणि माझ्या आईचं आयुष्य same मी काहीच बदलू शकले नाही . शिकून सवरून अडाणी राहिले . माझ्या आयुष्याची परफट नाही थांबवु शकले . 

उगाच लग्न केलं अस झालं ,
जगणं माझं जगायचं राहून गेल ,
आयुष्य म्हणजे काय ? 
कळण्याआधीच मन संसारात गुरफटून गेलं ..
आता चूल आणि मूल हेचं अस्तित्व खर ....





1 comment:

  1. खुप सुंदर लिहीलय...खुप मुलींच्या आयुष्यात असच घडत मनाविरुद्ध...👌👍💐🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...