कधी कधी असं वाटू शकत ,
की आपण ही उडाव त्या पाखरांसारख ,
आकाशी झेप घ्यावी उत्तुंग ...
नभात एक कोर कोरावी ,
त्याला आशेची किनार जोडावी ,
स्वप्नांची दुनिया त्यात रेखावी ...
परिस्थितीमुळे होत नाही शक्य ,
पण होणारच नाही असंही ही काही नाही ,
स्वतःला कधीही कमी लेखायच नाही ..
वाटू शकत कधी कधी आभाळाशी नातं जोडायच ,
ते कधीही शक्य नसतं ,
म्हणून स्वतः ला दोषी ठरवायच नसतं .
Written by - durga mate
खुप सुंदर, प्रेरणादायक रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDelete