दुःख दुःख सतत येणार दुःख ह्यामुळे माणसाचं मन सुकून जातं . जगण्याची त्याला उमेदच राहत नाही . सुख म्हणजे काय हे न समजताच दुखातच त्याला सुख मानव लागतं . आणि आयुष्य हे जगावं लागतं . नेहमी का माझ्या वाट्याला दुःख येत . काय चूक केली मी अस म्हणत , तो रडत रडत देवासमोर हात जोडून विनवण्या करत असतो . सुख मिळावे म्हणून .
पण अहो तुम्ही समजता . तेवढे दुःखी खरच आहात कस तुम्ही तुमच्या आयुष्यात ? मला विचाराल तर मी उत्तर नाहीच देईन . कारण माणूस हा कधीच दुःखी नसतो . नेहमी सुखीच असतो . देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे जगण्यासाठी तो आपल्याला दुःख का देईन , पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेन ते सुख देण्याचा .
ज्याला वाटत मी खूप दुःखी आहे . त्याने कधी दुःखी असल्याचं कारण शोधून पाहिलं का ? नसेल शोधली तर , शोधून बघा . एकदा स्वतः च्या आत डोकवून पहा . विचारा स्वतः ला का मी एवढा दुःखी आहे . काय कारण आहे मी दुःखी असल्याची . आणि कसे माझे दुःख कमी होईल ह्याचाही विचार करून बघा .
हाव
, लालचं ही कारण माणसाच्या आयुष्यात दुःख घेऊन येतं असतात . काही काही माणसाचं तर , मला हसूच येत त्यांना दुसऱ्याचं सुख पाहून दुःख होत . मग कसा मिळेल तुम्हाला सुखाचा आनंद .
जर तुमच्यातील नियत एवढी वाईट असेल तर , तुम्हाला सुख कसं मिळेल . तुम्ही जेव्हा तुमच्यातील हाव , जलपेपना संपुष्टात आणाल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील दुःख संपेल .
अगदी बरोबर आहे खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
ReplyDeleteअप्रतिम लिहिलय👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👌
ReplyDeleteApratim aahe
ReplyDeleteKhup changale
ReplyDelete