नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 1, 2021

ऑनलाईन प्रेम एक भास

माझा आजचा विषय ऑनलाईन प्रेम एक भास -

खरच हे ऑनलाईन प्रेम एक भासच आहे . कितीही एकमेकांमध्ये गुंतलो असलो तरी ही तो एक भासच असतो  .  जरी  बारा बारा घंटे एकमेकांशी बोलायची सवय असेल . तरी ते काय कामाचं शेवटी आहे तर , ऑनलाईन च ना .....

कधी भेटनं नाही , कधी बोलण नाही . एकमेकांविषयी जे ही काही माहीत असतं . ते ही खरं असतं का खोटं देवालाच ठाऊक .  तिचा डीपी बघून ह्याचा बीपी हाय होतो . म्हणून तिला सतत डीपी change करण्याचा नाद लागतो . हे असच असतं ऑनलाईन प्रेम -

मुके शब्द मुक्या भावना ,
कशाला हवी फुकटची वासना ,
ती ना कधी पुरी होऊ शकेल ,
ना ही तुमच्या आयुष्याला  नव वळण मिळेल ,

ऑनलाईन प्रेम करण्यापेक्षा आपल्या गावातल्या मुलामुलींची प्रेम कहाणी बघा - किती मस्त असत ना - तो तिला मस्त बुलट वरुन फिरवतो . तोऱ्यात सांगतो ही माझी होणारी आहे ना म्हणून हीचे नखरे झेलतो.  किती सुंदर असतं ते लाईव्ह प्रेम . लाइव्ह प्रेमाची मजा ऑनलाईन प्रेमाला कधीच येणार . शेवटी लाईव्ह ते लाईव्ह आणि ऑनलाईन ते ऑनलाईन ते ऑनलाईनच असतं . मग ते प्रेम असो किंवा वस्तू .

ऑनलाईन वस्तू ह्या  शक्यतो dubliket निघतात . मग प्रेम तरी कसं ओरिजनल निघेल .

जग मान्य करो व्वा न करो मी तर हेच म्हणणार ऑनलाईन प्रेम हा एक आभासच आहे .  आणि तो आ भासच  राहणार .  सत्यात फार फार तर एक टक्का उतरू शकतो .

हा लेख कोणाचेही मन आणि भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही . चूकिस क्षमस्व ...

3 comments:

  1. खूपच छान लिहिलंय 👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...