पहाट ही सजली ,
सड्या रांगोळीने नटली ,
दारी आले सूर्य नारायण ,
लाल केशरी किरण घेऊन ,
कोकिळा कुऊ कूऊ करू लागली ,
केळीच्या वनात ,
मोर नाचरा नाचू लागला ,
पावसाच्या सरीत ,
प्राजक्ताच्या फुलांने अत्तर शिंपडले ,
मनाला माझ्या मोहून टाकले ,
राऊळात पेटली प्रकाश ज्योती ,
घेवून आली ती अगंनी ज्ञान ज्योती ,
आज सकाळ माझी फुलली ,
प्रस्सनता तिने जीवनी आणली ,
अतिशय सुंदर,मन प्रसन्न करणारी रचना👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteसुंदर रचना अप्रतिम
ReplyDelete