नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 6, 2021

मनोगत लेखकाचे

आज खूप छान विषय सुचला मनोगत लेखकाचे ....

माझ्या परीने लिहिण्याचा प्रयत्न करत आहे . चुकल तर प्लीज माफ करा ...

लेखक समाजातील महत्वाचा घटक त्याच्या लिखाणातून तो कधी समाज प्रबोधन करतो , तर कधी मनोरंजन करून वाचकांना हासवतो . कधी प्रेम रंगात तल्लीन व्हायला लावतो . तर   कधी दुःखद  अनुभव लिहून वाचकांना भाऊक करतो . लेखक समाजाचे खूप देणं लागतो . त्याच्या विचारशक्तीच्या बळावर तो खूप काही बदलू शकतो .

लेखकांचां नेहमी  प्रयत्न असतो , भरभरून लिखाण करून वाचकांच मन जिंकून घेण्याचा , स्वप्न असतं त्याचं आपल लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच
लिखाणातून आपल्याला काही फायदा व्हावा हे त्यांच्या मनी ही नसत आणि ध्यानिही नसत . पण एक जरूर आपल्या भरभरून दाद मिळावी , पोच पावती म्हणून खूप साऱ्या समीक्षा मिळाव्या ही आशा मात्र त्याच्या मनात असते . आणि तो ती आशा प्रामाणिकपणे बोलूनही दाखवतो . ती पोचवती त्याची प्रेरणा असते . म्हणून तिची त्याला आस लागलेली असते. चार चौघात आपल लिखाण दर्जेदार असावं , हा ही लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न असतो .

आम्हा लेखकांना फार काही नको असतं पोचपावती म्हणून तुमची एक समीक्षा आणि आमच्या लिखाणाला वाचक मंडळीकडून  भरभरून दाद मिळावी एवढीच काय ती आमची  आशा ......


3 comments:

  1. क्या बात है सुंदर बरोबर आहे. खूपच कुतूहल निर्माण झाले आहे

    ReplyDelete
  2. 👌👌👌👌👌👌👌अगदी बरोबर सांगितले आहे

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...