देवा तू ही जगूनी घे रे ,
मानवाचे जीवन हे ,
एकदा जन्म घे रे ,
सुख दुःखाचे तू ही सोस घाव ,
नाही तिराईतेचा हा भाव ,
संकटावर कशी करावी मात हे तूच दाव ,
तू एकदा जन्म घ्यावं ,
आयुष्याचं ह्या गुपित उलगडावं ,
शुद्ध मनाची एक आस ,
तुझ्यासाठी खास ,
तू एकदा जन्म घे ,
मानवाचे मोल मानवाला दाखवून दे ,
तू एकदा जन्म घे ,
स्त्री पुरुष समानतेचा जागर कर ,
सर्व धर्म समभाव ह्याची मुहूर्त मोड रोव ,
देवा घे रे तू एकदा जन्म ,
करेन मी तुझी सेवा आजन्म ,
मस्त लिहलं!✍️������
ReplyDeleteमहत आहे
ReplyDelete