,
एक कळी कोलमडून गेली ,
खंत तिच्या जीवनाची आज मांडू लागली ,
मुलगी म्हणून जन्माला आले ,
काय एवढे पाप केले ,
स्त्रित्वाचे भोग नशिबी आले ,
आज खर तर , तिच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस , तरीही ती खूप नाराज दिसायला एकदम सुंदर दृश्ट लागेल अशी दिसायची . पाने दार डोळे , टोकदार नाक गोरापान रंग मनाला भुरळ घालणारा . आज चेहऱ्यावर तेज असूनही मावळले होते . मनात हजारो प्रश्न उगवले होते .
आज तिला कळलं होतं की ती लवकरच आई होणार तिच्या स्त्रीत्वाचं सार्थक होणार . बातमी ऐकून खूप खुश झाली . दवाखान्यातून घरी येताच सासूने नजर काढली . दृष्ट लागू नये म्हणून दीट काढली . ती आतून खूप सुखावली किती तरी दिवसांनी आज पाहिली बार तिची सासू तिच्याशी एवढ्या प्रेमानी वागली होती . लग्नाला तीन वर्ष झाले , कुठे बाहेर जायचं ठरलं तर , सासूला तीनदा विचारावं लागायचं . आयुष्य तिचं होतं निर्णय मात्र दुसरेच घ्यायचे . ओक्सिजन उपलब्ध असूनही श्वास घेण्यासाठी तळमळत होती . हीच का तिच्या स्त्रित्वाची कहाणी होती .
वयाच्या अठराव्या वर्षी लग्न करून सासरी आली . सख्या
आईने तिच्या मनाचा विचार न करता . तिला ज्याच्याशी तिचं लग्न लावून द्यायचं होतं . त्याचं मुलाशी तिचं लग्न लावून दिलं . ती तर खूप हा दरून गेली . मनातील ई श्चा आकांशा बाजूला ठेवून तिच्या आई वडिलांच्या सुखासाठी बोहोल्यावर उभी राहिली .
हळद लागता अंगी ,
स्वप्न तिची भंगली ,
आई वडिलांच्या सुखासाठी ,
पोरं ती शहाणी झाली ,
मूग् गिळून गप्प बसली ,
होणारा अन्याय सहन करत राहिली ....
मुलगी नको मुलगा हवा होता आईला ,
काळजाचा तुकडा मानत होती बापाला ,
वारंवार डास पुसीचे चटके मिळाले होते मनाला ,
आई भेद भाव करत होती क्षणा क्षणाला ,
ते घाव सलत होते तिच्या मनात ,
वेदनेने त्या पाणी येतं होते डोळ्यांत ,
बदलेल कधीतरी माझी जीवन कहाणी ,
जगत होती ह्या आशेवर ,
देवाने दिलेल्या सहन शक्तीच्या बळावर ...
लग्न झालं आयुष्याची कहाणी काही बदलली नाही . आई सासुरवास करत होती. म्हणून सासूने सासुरवास केलेला , ह्यात तिला विशेष असं काही वाटतं नव्हत .
सख्खी आई असताना आपल्याशी किती तिरस्कार पद वागत होती . शेवटी ही सासू आहे . सासुरवास करण हीचा जन्म सिध्द अधिकार आहे असं म्हणत ती त्या वेदना तो सासुरवास सहन करायची .
खूप त्रास व्हायचा पण आईचा एक शब्द हे सारं सहन करायला भाग पाडत होता . " एकदा मुलीने सासर सोडलं म्हणजे तिने एकतर नव ऱ्या सोबत बाहेर पडावं . नाहीतर सरणावर जातांना . लेकीने मध्येचं घर सोडून येणं हे आई वडिलांसाठी अपमानास्पद असतं .
हे वाक्य तिने अतोनात पाळलं घर सोडून येणाचा कधी स्वप्नात पण विचार नाही केला . तीन वर्ष आई होऊ शकली नाही . म्हणून कितीतरी वेळेस तू वांझ आहेस स्त्रित्वा वर एक डाग आहेस . ह्याहूनही कितिवरी न ऐकावी अशी वाक्य तिने ऐकली होती . तरीही ती जगत होती . संय माने परिस्तिथी बदलण्याची वाट बघत होती .
पण तिची आशा आणि संयम व्यर्थं ठरला . जेव्हा आई होणार असं कळलं तेव्हा सासूने बजावून सांगितल मला मुलगा नको मुलगीच हवी . वंशाला दिवाच हवा . क्षणात विझून जाणारी पणती नको . ते काय तिच्या हातात होतं का ? निसर्गाने जे दिलं ते आपण स्वीकारावं असं ती सासूला वारंवार समजाऊन सांगत होती . पण सासू ऐकणाऱ्यातील नव्हती . तिने मुलाला खणकावून सांगितल तुम्ही गर्भ तपासणी करून घ्या . मुलगी असेल तर ती नको आपल्याला मुलगा असेल तर गावात पेढे वाटा . मुलाला हे काही पटेना लोकं काही म्हणतील आता मुलगा मुलगी असं काही नसतं . सारे सारखेच असतात .
मग का ? आई हा हट्टहास असं म्हणत तो ही त्याच्या आईला समजावत होता . पण आई ती हट्टालाच पेटलेली . ऐकत नव्हती आईच्या इश्चेखातर मुलगा गर्भ तपासणीसाठी तयार होतो . तपासणी नंतर कळत मुलगी होणार तेव्हा हिला खूप आनंद होतो . माझ्यातलाच माझा असा अंश माझ्याच पोटी जन्म घेणार . माझा स्त्री जन्म सजनार . आनंदाला पारावर राहिला नव्हता . पण ते सार क्षणभराचं होतं थोड्याच वेळात डॉक्टर येतात आणि तिला सांगतात . तुमचं अबॉशन करायचं आहे . बातमी ऐकताच तिच्या डोळ्यांत पाणी येतं . तेवढ्यात तिचा नवरा येतो . तेव्हा ती त्याला म्हणते , " अहो , काय हे ? काय म्हणताय डॉक्टर अबॉशन ते कशासाठी ? जे माझ्या पोटात वाढत आहे . ते आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे . त्याची लिंग काय आहे . हे जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार नव्हता तरी , आपण जाणून घेतलं . आणि आता ते स्त्रीलिंगी निघालं म्हणून त्याला खोडून टाकायचं . "
तो त्याला हिचं म्हणणं पटतं होतं पण आईला दुखवायचं नव्हतं म्हणून हिला समजावंन त्याला भाग होतं . " तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आईच काय आईला नको ती हे बाळं कधीचं स्विकारणार नाही . ही जगताना मरन यातना भोगेन ग आणि माझ्या अंशाने माझ्या डोळ्यासमोर मरणयातना भोगण्या पेक्षा त्याने जन्मचं न घेणं ह्यात काय वाईट आहे . "
" आपण असताना ती कशा मरण यातना सहन करेल , आणि आई कोण आहेत आपल्याला सांगणाऱ्या हा आपला अंश आहे . ह्याच्यावर पूर्णपणे आपला अधिकार आहे . कोणा तीराईतेचा नाही . "
" हो सगळ मान्य आहे , पण तरीही तिचा शब्द खाली न पडू देणं हाच माझा संकल्प आहे . तू अबॉशनसाठी तयार हो . " असं म्हणून तो बाहेर गेला . हिचे अश्रू अनावर झाले . ती शेवटचा आपल्या पोटाला हात लावून अँकुरलेल्या गर्भाला सांगत होती .
" बाळा मला माफ कर . तू आयुष्यात असताना सुध्धा मी तुला स्वीकारू शकत नाही . खूप दुर्दैवी आहे रे मी जगातील सगळ्यांत कमनशिबी स्त्री जिला कधी आई असूनही आईच प्रेम मिळालं नाही . आणि आता तुझ प्रेम ही नाकारत आहे . असं म्हणून ती अबॉशन साठी तयार होती . आपला गर्भ पाडून स्वतःच्या हाताने ती आज वांझ ठरणार होती .
शेवटी न राहवून ती म्हणते ,
" कधी फिटेल हे अंधाराचे जाळे ,
प्रकाश किरण कोण घेऊन येईल नवे ,
जे मला हवे , जीवनास माझ्या प्रेरणा देणारे नवे ....."
निसर्गाने जे दिलं ते आपण प्रेमाने स्वीकारायला हवं , मुलगा मुलगी असं काही नसतं मानल तर एक मुलगी मुलाच्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते . आणि एक मुलगा मुलीच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो . ते आपल्या मानण्यावर असतं .
ही कथा पूर्णतः काल्पनिक तेवर आधारित आहे .
चुकीस क्षमस्व :
उत्कृष्ट लिखाण, वास्तविक जीवन
ReplyDeleteअतिशय हृदयस्पर्शी , वास्तववादी लिखाण👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय हृदयस्पर्शी,वास्तववादी लिखाण 👌👌👌👌
ReplyDeleteApratim katha
ReplyDelete