नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2021

आज उद्या नसेल तर

माझा आज उद्या नसेल तर ,
कसा ठेऊ विश्वास मी भविष्यावर ,

मला वाटते भविष्याची भीती ,
भीतीने बदलते विचारांची गती ,

आजचा अल्लड पना , उद्याही राहील ना टिकून ,
का रडतं बसावं लागेल स्वप्नांना विकून ,

आज जिकडे पाहावे तिकडे सुखाचे दिवे ,
त्याच दिव्यातून उद्या पेटणार तर नाही ना , दुःखाचे वणवे ,

आज स्वंत्रत विचारांची माझी कहाणी ,
उद्या गुलामीची द्यावी तर लागणार नाही ना बयानी ,

आज सुखाने भरलेले माझे डोळे ,
उद्या होणार तर नाही ना  , दुःखाने ओले ,

सुंदर आयुष्याचे स्वप्न रंगवले मी आज ,
उद्याच्या येण्याने बदलणार तर नाही ना , त्याचा माज ..

4 comments:

  1. अतिशय सुंदर रचना दुर्गा दिवसेंदिवस तुझ्या लेखनात प्रगल्भता येत चाललीय खुप खुप सुंदर तुझी साहित्य कारकीर्द उज्वल आहे

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम सुंदर लिखाण

    ReplyDelete
  4. खुप छान लिहीलयस 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...