माझा आज उद्या नसेल तर ,
कसा ठेऊ विश्वास मी भविष्यावर ,
मला वाटते भविष्याची भीती ,
भीतीने बदलते विचारांची गती ,
आजचा अल्लड पना , उद्याही राहील ना टिकून ,
का रडतं बसावं लागेल स्वप्नांना विकून ,
आज जिकडे पाहावे तिकडे सुखाचे दिवे ,
त्याच दिव्यातून उद्या पेटणार तर नाही ना , दुःखाचे वणवे ,
आज स्वंत्रत विचारांची माझी कहाणी ,
उद्या गुलामीची द्यावी तर लागणार नाही ना बयानी ,
आज सुखाने भरलेले माझे डोळे ,
उद्या होणार तर नाही ना , दुःखाने ओले ,
सुंदर आयुष्याचे स्वप्न रंगवले मी आज ,
उद्याच्या येण्याने बदलणार तर नाही ना , त्याचा माज ..
अतिशय सुंदर रचना दुर्गा दिवसेंदिवस तुझ्या लेखनात प्रगल्भता येत चाललीय खुप खुप सुंदर तुझी साहित्य कारकीर्द उज्वल आहे
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लिखाण
ReplyDeleteखुप छान लिहीलयस 👌👌👌👌
ReplyDelete