नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 1, 2021

कर काहीतरी

करून बघायला काय हरकत आहे ,
तुझीच तुला परवानगी आहे ,
दोन घडीचे हे जीवन ,
 रोज शिक काहीतरी नवीन ,
 
इथे तुला अडवणार कोण आहे ,
सर्व काही तुला ठरवायचं आहे ,
मी  तर फक्त सपोर्ट सिस्टीम असेन ,
तुझ्या कोणत्याच गोष्टीला माझी ना नसेन ,

योग्य तो सल्ला देणं माझा अधिकार आहे ,
ऐकायचं की नाही तो तुझा प्रश्न आहे ,
काय चांगलं काय वाईट हे तुला कळत ,
माझं ऐकणं तेव्हढ नाही जमत ,

तरीही सांगते कर काहीतरी ,
करणार नाही काही तर , लवकरच होशील भिकारी ,
बिन पगारी फुल अधिकारी ...
आयुष्याला अर्थच नसेल काही ...



1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...