आयुष्याची एक नवीन करता यायला हवी ..
दुःखाची झळ सोसून सुखाची आस असायला हवी ..
आहे त्या परिस्थितीत सुख मानून तिथेच कूडत बसण मला पटत नाही ...आयुष्याची एक नवी सुरुवात करण्यात च आयुष्य जगण्याची एक गमंत असते ...ती गमंत च अनुभवता यायला हवी ...तरच आयुष्याला दिशा मिळेल नवी ...
पुन्हा एकदा एक नवी सुरुवात करूया ..
आयुष्य आपलं ...आनंदाने जगूया 😊😊😊
सुरुवात..
विसरून मतभेद सारे .. विस्कटलेल्या.नात्यांमध्ये नव्याने प्रेम शोधू या ..भूतकाळात घडलेल्या वाईट घटना विसरून फक्त वर्तमानावर फोकस करूया ....
घडल्या असतील ह्या आधी हातून बऱ्याच चुका ...त्या आज सुधारून ..पुन्हा नेहमीच्या त्याचं त्या चुका आपल्या हातून घडणार नाही .. ह्यावर थोडं लक्ष केंद्रित करूया ......
आम्ही सोबतच होतो ....बिझनेस किंवा शिक्षण ..सोबत स्टार्ट केलेलं ..आज तो किती पुढे गेला ...आणि मी इथल्या इथेच धूळ खात बसलेलो ..काय नशीब काढल साल्याने ...
त्याची झालेली प्रगती बघून वाईट वाटून घेण्यापेक्षा दुःखी त होण्यापेक्षा ....मी त्याच्या पुढे कसा जाईल ..ह्याचा विचार जास्त प्रमाणात करण केव्हाही योग्य ...
हा माझ्याशी खूप वाईट वागलेला आहे ..मी ह्याला कधीचं माफ करणार नाही...जर तो आज कितीही चांगला वागत असला तरी मी त्याला माफ करणार नाही ..विसरून जा तो कधीतरी वाईट वागलेला आहे ...
तो आज आपल्याशी चांगलं वागतोय .. मग त्या गोष्टीवर जास्त फोकस करा ...आणि त्याच्याशी चांगलं वागून नात्याला नवीन वळण देण्याची तसदी घ्या ...
मला तो माझ्या आयुष्यात हवाय ..मी किती चांगलं वागते त्याच्याशी ...आणि तो तो तर मला भाव च देत नाही ..
त्याच्या बद्दल चोवीस तास विचार करत बसण्या पेक्षा सरळ त्याला इग्नोर करा ..त्रास होईल ..त्याचा जो पर्यंत आपल्याला विसर पडत नाही तोपर्यंत ..पण नंतर तुम्ही जास्त हॅपी रहायला शिकाल .. आयुष्यातील नैराश संपून जाईल ...
कुठल्याही वळणावर ..
आयुष्याची एक नवीन करता यायला हवी ..
दुःखाची झळ सोसून सुखाची आस असायला हवी ..
आहे त्या परिस्थितीत सुख मानून तिथेच कूडत बसण मला पटत नाही ...आयुष्याची एक नवी सुरुवात करण्यात च आयुष्य जगण्याची एक गमंत असते ...ती गमंत च अनुभवता यायला हवी ...तरच आयुष्याला दिशा मिळेल नवी ...
पुन्हा एकदा एक नवी सुरुवात करूया ..
आयुष्य आपलं ...आनंदाने जगूया 😊😊😊
Good evening .. गरमा गरम चहा सोबत माझा हा लेख एन्जॉय करा ..हॅपी रीडिंग
👌
ReplyDelete