जगण्याची उमेद होऊ दे मला ,
दीन दलितांच्या मनात ,
एक महत्वाचं स्थान दे मला ...
वटवृक्षाच्या छायेत ,
जरा विसावू दे मला ...
प्रखर ह्या उन्हाची ,
झळ लागू दे मला ...
आशा निराशाच्या ह्या जगात ,
सुख दुःखाची सोबत असू दे मला ,
देवाऱ्यातल्या प्रकाशाची ज्योत होऊ दे मला ...
आशा निराशच्या ह्या जगात ...
आसावलेल्या डोळ्यांची ,
तहान होऊ दे मला ,
कोणा भुकेल्या हृदयाची ,
भूक होऊ दे मला ....
आशा निराशाच्या ह्या जगात ,
जगण्याची आस दे मला ...
खुपच सुंदर 👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना...👍👌✍️🍫
ReplyDeleteApratim rachna 👌👌👌
ReplyDeleteछान रचना 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteखुपच सुंदर
ReplyDelete