डोळे भरुनी बघतांना ,
आनंद होई मनाला ,
रिते हे घर आपुले ,
बघ कसे रे सजले ,
तू मला मी तुला ,
वळणावळणावर सावरले ,
त्याचेच ते फळ जणू आज ,
पदरी पडले ,
घरकुल माझे आनंदाने सजले ..
ती चिमणी घेऊन आली ,
चिव चिव चिव ,
ऐकुन तिची चिव चिव ,
नशिबाला ही आली किंव ,
तिच्या रुपात पदरी पडले सोने ,
मी पावन झाले ,
तो लाडका माझा स्पर्श ,
वाढवेल रे ह्या कुळाचा वंश ,
सारे इथे माझेच अंश ,
प्रेमाने करतात दंश ,
तुझ्या साथीने ,
ते सारे मिळाले ,
घराला माझ्या घरपण आले ,
मन आता भरून आले ,
ओंजळीतील दुःख सारे सरले ,
सुख अतोनात भरले ,
घर माझे आनंदाने सजले ,
घराला घरपण आले ...
आतिशय सुंदर रचना खुपच आवडली
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली 👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम खूपच सुंदर रचना������������
ReplyDelete