असावं असं कोणीतरी ,
डोळ्यांत ल पाणी अलगद टीपणार ,
त्याला बघताच दुःख हलक होणार ,
काय झालं ?
का डिस्टर्ब आहेस ?
असं म्हणत सतत विचारपूस करणार ,
असावं असं कोणीतरी ,
काळजाच्या मनमंदिरत ,
घर करून राहणार ,
असावं असं कोणीतरी ,
वेदना आणि जखमेवरच ,
औषध होणार ,
असावं असं कोणीतरी ,
त्याच्यावर फक्त आपलाच हक्क आहे ,
असं वाटणार ...
खूपच सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना एक प्रियसीच्या माफक अपेक्षा छान मांडल्या आहेत
ReplyDelete