नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 1, 2021

माझ्या मना सांगना

माझ्या मना सांगना ,
काहीतरी बोलना ,
शब्द हिताचे तू ऐकना !

माझ्या मना सांगना ,
डोळे पूसावयास रडणाऱ्याचे ,
हट्ट पुरवयास बालकाचे !

माझ्या मना सांगना ,
गोर गरीबांचे दुःख तू ऐकना ,

दीन दुबळ्यांची  सेवा करना !

माझ्या मना सांगना ,
अन्याया विरुद्ध लढायला ,
सत्याच्या बाजूने बोलायला !

माझ्या मना सांग ना ,
मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला ,
वृक्षावर होणाऱ्या कुऱ्हाडीचे घाव थांबवायला !

माझ्या मना सांगना ,
आई वडिलांचा आदर करायला ,
मित्र मैत्रिणींचा मान रखायला ,
शिक्षकांचा सन्मान करायला ,
नात्यांची वीण जपायला !

माझ्या मना सांगना ,
काहीतरी तू बोलना ,
शब्द हिताचे तू ऐकना !


2 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...